beauty parlor

लग्नाच्या वाढदिवशी(marriage Anniversary) बायको ब्यूटी पार्लरला(Beauty Parlor) जाण्याच्या निमित्ताने सासरहून निघाली. बराच वेळ झाला तरी ती परत आलीच नाही.

  जयपूर : लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी(Marriage Anniversary) ब्यूटी पार्लरला(Beauty parlor) जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडलेली बायको परत आलीच नाही. अखेर वाट बघून नवरा आग्य्राला तिच्या माहेरी पोहोचला. सुमारे ३१ तास वाट पाहिल्यानंतरही पतीदेवाला रिकाम्या हातीच घरी परतावे लागले.

  राजस्थानातील अजमेरमधील वैशाली नगरमध्ये राहणाऱ्या अविनाश वर्मा याचा विवाह उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सुलहकुल नगरातील तरुणीशी झाला होता. अविनाश अकाऊण्टंट आहे, तर त्याचे वडील सेवानिवृत्त नायब तहसीलदार आहेत. लग्नाच्या वाढदिवशी बायको ब्यूटी पार्लरला जाण्याच्या निमित्ताने सासरहून निघाली. बराच वेळ झाला तरी ती परत आलीच नाही.

  अविनाशने बायकोला फोन लावला. ती थोड्या वेळात येते, असं म्हणत चालढकल करु लागली. त्यामुळे अविनाशला संशय आला. अखेर तिने आपण माहेरी आल्याचं कबूल केलं. तो नेमकं काय झालंय, हे पाहण्यासाठी तिच्या मागून माहेरी आग्य्राला गेला. मात्र सासुरवाडीला कोणी साधा दरवाजाही उघडला नाही.

  काही वेळाने सासुरवाडीहून निरोप आला, की मुलगी तीन दिवसांनी परत येईल.काही दिवसांनी अविनाशच्या घरी अजमेर पोलीस पोहोचले. तेव्हा समजलं, की पत्नीने महिला आयोगात अविनाशने हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश अजमेर पोलिसांना देण्यात आले होते.

  अविनाशला त्याच्या आई-वडिलांनीच संपत्तीतून बेदखल केलं. त्यालाही नोकरीही गमवावी लागली. बायको फोनवर बोलू लागली, पण नांदायला यायला तयार होईना. बायकोचा अंतिम निर्णय जाणून घेण्यासाठी अविनाश गेल्या शनिवारी पुन्हा तिच्या माहेरी गेला. मात्र तो येताच बायको नातेवाईकांकडे गेली. फोनही घेईना. अविनाश अख्खी रात्र सासुरवाडीच्या गेटवर ठिय्या देऊन होता. रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत वाट बघून तो घरी परतला.

  बायको ताकास तूर लागू देत नसताना बायकोच्या शेजाऱ्यांनी मात्र त्याला जेवण-खाण देण्याची तयारी दाखवली, अविनाशने मात्र ऑनलाईन जेवण मागवलं. शेजाऱ्यांनी दयेपोटी त्याची झोपण्याची व्यवस्था केली. मात्र बायकोने दर्शन न दिल्यामुळे अविनाश पेचात आहे.