नवऱ्यासमोरच बायकोवर झाला बलात्कार – आधीच्या नवऱ्याच्या भावाने शेतात नेऊन केला घृणास्पद प्रकार

राजस्थानातील (rajasthan)एक महिला दुसऱ्या पतीसह मुलगा आणि लहान बहिणीसह शनिवारी रात्री घरी(rape in rajasthan) जात होती. त्याचवेळी छाजवर गावाजवळ महिलेच्या घटस्फोटीत नवऱ्याच्या भाऊ आणि चार जण त्यांना भेटले. त्यांनी पीडितेच्या कुटुंबाला शेतात नेले.

    महिलांवरील अत्याचाराच्या(rape) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राजस्थानमधील(rape in rajasthan) बारण जिल्ह्यामध्ये महिला अत्याचाराचा एक विचित्र प्रकार घडला आहे. एका महिलेवर तिच्या पतीसमोरच घटस्फोटीत नवऱ्याच्या भावाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

    पीडित महिला दुसऱ्या पतीसह मुलगा आणि लहान बहिणीसह शनिवारी रात्री घरी जात होती. त्याचवेळी छाजवर गावाजवळ महिलेच्या घटस्फोटीत नवऱ्याच्या भाऊ आणि चार जण त्यांना भेटले. त्यांनी पीडितेच्या कुटुंबाला शेतात नेले. तिच्या नवऱ्याला मारून त्याचे हातपाय दोरीने बांधले. पतीसमोरच महिलेवर तिच्या आधीच्या पतीच्या भावाने बलात्कार केला.

    या सगळ्या घटनेनंतर आरोपी फरार झाला. पीडित महिला पतीसह लहान मुल आणि बहिणीला घेऊन कशीबशी मुख्य रस्त्यावर आली. त्यानंतर त्यांना काही प्रवाशांनी मदत केली. तसेच पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

    दरम्यान पीडित महिलेची रविवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या आरोपीसह दोघांना अटक केली आहे.