चालत्या रेल्वेखाली सापडली महिला, प्रसंगावधान राखत असा वाचवला जीव, पाहणाऱ्यांच्या काळजाचा चुकला ठोका

ही घटना आहे झारखंडमधल्या महाराजपूर रेल्वे स्टेशनवरची. या परिसरात लाकूडफाटा गोळा करण्यासाठी आणि आपला चरितार्थ चालवण्यासाठी अनेक आदिवासी महिला ये-जा करत असतात. जंगलातून गावात येण्यासाठी मधून जाणारा रेल्वे ट्रॅक त्यांना ओलांडावा लागतो. गेल्या आठवड्यात याच ट्रॅकवर एक मालगाडी थांबली होती. त्यामुळे महिलेनं या मालगाडीला वळसा घालून जाण्याऐवजी मालगाडीखालून पलीकडे जात रेल्वे स्टेशन ओलांडण्याचा विचार केला. 

    अचानक जीवावर आलेल्या संकटामुळे अनेकजण खचून जातात. धीर सोडतात. त्यामुळेच ते त्या संकटाला बळी पडल्याची उदाहरणं आपण पाहतो. मात्र नुकत्याच समोर आला. नुकत्याच घडलेल्या एका घटनेनुसार एका आदिवासी महिलेनं प्रसंगावधान राखत कशा प्रकारे स्वतःचे प्राण वाचवले, याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

    ही घटना आहे झारखंडमधल्या महाराजपूर रेल्वे स्टेशनवरची. या परिसरात लाकूडफाटा गोळा करण्यासाठी आणि आपला चरितार्थ चालवण्यासाठी अनेक आदिवासी महिला ये-जा करत असतात. जंगलातून गावात येण्यासाठी मधून जाणारा रेल्वे ट्रॅक त्यांना ओलांडावा लागतो. गेल्या आठवड्यात याच ट्रॅकवर एक मालगाडी थांबली होती. त्यामुळे महिलेनं या मालगाडीला वळसा घालून जाण्याऐवजी मालगाडीखालून पलीकडे जात रेल्वे स्टेशन ओलांडण्याचा विचार केला.

    ही महिला मालगाडीखालून ट्रॅक ओलांडत असतानाच अचानक रेल्वे सुरू झाली आणि चालू लागली. यावेळी प्रसंगावधान राखत ही महिला रेल्वे ट्रॅकवर झोपून राहिली. अख्खी मालगाडी निघून जाईपर्यंत ही महिला जागची हललीदेखील नाही. त्यामुळे तिच्या अंगाला साधं खरचटलंही नाही आणि या संकटातून ती सहीसलामत बाहेर पडली.

    ही घटना घडत असताना बघ्यांची गर्दी जमा झाली होती. महिला चालत्या रेल्वेखाली अडकून पडल्याचं पाहताच काही उपस्थितांनी आरडाओरडा सुरु केला आणि बघता बघता बघ्यांची गर्दी झाली. ही महिला या संकटातून सहीसलामत बाहेर पडावी, अशी प्रार्थना सगळेच करत होते.