मध्य प्रदेशमधील भाजपा कार्यालयामध्ये महिलांसोबत छेडछाड, व्हिडिओ झाला व्हायरल

मध्य प्रदेशमध्ये(madhya pradesh) भाजपा कार्यालयात(Bhartiya janata party) दोन महिलांशी छेडछाड(woman teasing video) झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये(madhya pradesh) भाजपा कार्यालयात(Bhartiya janata party) दोन महिलांशी छेडछाड झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील दोन महिलांनी भाजपा कार्यालयात आपल्याशी छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे. या महिलांचे म्हणणे आहे की, हा सर्व प्रकार भाजपा कार्यालयाच्या ग्रंथालयमध्ये घडला आहे.

    मध्य प्रदेश काँग्रेसनेही हा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर निशाणा साधला आहे. असे असले तरी या महिलांनी अद्याप याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली नाही. आरोप करणारी महिला म्हणाली की, एका वयस्कर भाजपा कार्यकर्त्याने त्यांच्यासोबत छेडछाड केली. या महिलेने आपल्या मैत्रिणींसोबतही असाच प्रकार घडल्याचा आरोप केला आहे. या व्हिडिओत ही दुसरी महिलाही दिसत आहे. या व्हिडिओबद्दल बोलताना भाजपाच्या स्थानिक नेत्याने सांगितले की, या व्हिडिओची सत्यता तपासली जात आहे.

    चौहान यांना केले लक्ष्य
    हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत मध्य प्रदेश काँग्रेसने ट्विटरवर लिहिले की, भाजपा कार्यलयात लैंगिक शोषण, भाजपच्या कृतीने मध्य प्रदेश बदनाम. आमदार खरेदी करून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या राज्यात दररोज १५ मुलींवर अत्याचार आणि १६ मुलींच्या अपहरणाच्या आकड्यांनंतर भाजपा कार्यालयात लैंगिक शोषणाची बातमी लाजिरवाणी आहे.