Women get election tickets only if they have contact with a male leader; Claim by the President of the National Commission for Women

पुरुष नेत्याशी संपर्क असेल तरच महिलांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले जाते, असा दावा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केला आहे. ज्या व्यक्तिची प्रतीमा मलीन झालेली असते. ज्यांच्यावरोधात गंभीर आरोप असतात. अशा उमेदवारांना विविध पक्षांकडून आवर्जून तिकीट दिले जातं. मात्र, राजकीय पक्षांना तेच तिकीट एखाद्या महिलेला द्यायला द्यावंसं वाटत नसल्याचं रेखा शर्मा म्हणाल्या.

हैद्राबाद : पुरुष नेत्याशी संपर्क असेल तरच महिलांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले जाते, असा दावा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन वाद होत आहे. हैदराबादमध्ये मौलाना आझात नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या महिला अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या.

ज्या व्यक्तिची प्रतीमा मलीन झालेली असते. ज्यांच्यावरोधात गंभीर आरोप असतात. अशा उमेदवारांना विविध पक्षांकडून आवर्जून तिकीट दिले जातं. मात्र, राजकीय पक्षांना तेच तिकीट एखाद्या महिलेला द्यायला द्यावंसं वाटत नसल्याचं रेखा शर्मा म्हणाल्या.

दरम्यान, महिलांना निर्णय घेण्याचा अधिकार संसदेत आणि विधिमंडळात असणं आवश्यक आहे. अन्यथा त्या फक्त घरातील काम करत राहतील. जर महिलांना तिकीट द्यायचं झालं तर महिला निवडणूक जिंकू शकेल का?, असा प्रश्न उपस्थित करत डावललं जात असल्यातं शर्मा यांनी म्हटलं आहे.

अगदी स्थानिक निवडणुकांपासून ते संसदेपर्यंत निवडणुकांमध्ये महिलांसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. महिलांचा प्रत्यक्ष राजकारणात सहभाग वाढावा, महिलांचे प्रश्न समजून त्यांनी सोडवण्यासाठी प्रतिनिधित्व करावं अशी अपेक्षा असते. मात्र, निवडणूक लढवण्यासाठी पक्षाचे तिकीट हवे असेल तर लॉबिंग केली जाते, यावर त्यांनी ताशेरे ओढले आहेत. रेखा शर्मा यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.