आणखी १० नोटिसा पाठवा, विधानावरून हटणार नाही, ममता बॅनर्जींचं आव्हान, वातावरण तापलं

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या आडून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केलाय. अशा कितीही नोटिसा पाठवल्या तरी आपण विधानावरुन हटणार नसल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जींवर भाजपनं केलाय. त्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस पाठवलीय. मात्र ही नोटीस म्हणजे दबावाचं राजकारण असल्याचा पलटवार ममता बॅनर्जी यांनी केलाय. 

    बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अधिकच रंगतदार होऊ लागलाय. आव्हानं आणि प्रतिआव्हानं या  दरम्यान आता निवडणूक आयोग विरुद्ध ममता बॅनर्जी असा संघर्षही पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जींना नुकत्याच पाठवलेल्या नोटिशीवरून चांगलंच रामायण रंगलंय.

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या आडून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केलाय. अशा कितीही नोटिसा पाठवल्या तरी आपण विधानावरुन हटणार नसल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जींवर भाजपनं केलाय. त्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस पाठवलीय. मात्र ही नोटीस म्हणजे दबावाचं राजकारण असल्याचा पलटवार ममता बॅनर्जी यांनी केलाय.

    प्रकरण काय आहे?

    राज्यातील सर्व मुस्लिमांनी तृणमूल काँग्रेसला मतदान करावं आणि एकगठ्ठा पक्षाच्या पाठिशी उभं राहावं, असं आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतंच एका प्रचारसभेत केलं होतं. त्यानंतर मुस्लिम मतांचं तुष्टीकऱण करून ममता बॅनर्जी ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपनं केला होता. पंतप्रधान मोदींनीही हा मुद्दा गेल्या प्रचारसभेत उचलून धरला असता. सर्व हिंदूंनी भाजपला मतदान करावं, असं आवाहन आम्ही केलं असतं, तर निवडणूक आयोगानं आम्हाला नोटीस पाठवली असती, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. त्यानंतर लगेचच निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जींना नोटीस पाठवली होती.