‘या’ बादशाहाला एका दिवसात लागायचे 35 किलो अन्न

नाश्त्यात एक कटोरी मध, एक कटोरी लोणी आणि शे-दिडशे केळे सुल्तान खात होता. फारशी आणि युरोपीयन इतिहासकारांचा असा विश्वास होता की, सुल्तान महमूद बेगडा भरपूर जेवत होते. सुल्तान एका गुजराती टीले इतके म्हणजेच जवळपास 35 ते 37 किलो अन्न फस्त करत असल्याचा उल्लेख या इतिहासकारांनी त्यांच्या गोष्टींमध्ये केला आहे. जेवण झाल्यानंतर सुल्तानला गोड खायची सवय होती. त्यांना जेवणानंतर एक किंवा दोन कटोरी गोड पदार्थ खाणे पसंत होते. ते गोड खाण्याच्या बाबतही सर्वांच्या पुढे होते.

    गुजरात : गुजरातचा सहावा सुल्तान बादशाह महमूद बेगडा हा खाण्याचा खूपच शौकिन होता. त्याच्या पराक्रमासाठी जेवढा हा बादशाह प्रसिद्ध होता, तो त्यापेक्षाही जास्त त्याच्या खाण्याच्या सवयीमुळे जास्त प्रसिद्ध होता. याने गुजरातमध्ये इ.स.1459-1511 या दरम्यान वयाच्या तेराव्या वर्षापासून ते 53व्या वर्षापर्यंत शासन केले. तो त्याकाळातील जास्त काळ शासन केलेला राजा होता.

    सुल्तान महमूद बेगडा यांचे शरीर धष्टपुष्ट होते. तसेच त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि त्यांची दाढी कमरेपर्यंत पोहचत होती. त्यांच्या मिशा देखील खूप लांब होत्या. जास्त प्रमाणात अन्नाची गरज त्यांच्या धष्टपुष्ट शरीराला होती. अनेक किस्से त्यांच्या खाण्याबाबत प्रसिद्ध आहे. असे म्हणले जाते की, तो जास्त प्रमाणात जेवत होते. सुल्तानचा नाश्ता साधारण माणसाचे जेवढे जेवण असते त्याहूनही जास्त होता.

    नाश्त्यात एक कटोरी मध, एक कटोरी लोणी आणि शे-दिडशे केळे सुल्तान खात होता. फारशी आणि युरोपीयन इतिहासकारांचा असा विश्वास होता की, सुल्तान महमूद बेगडा भरपूर जेवत होते. सुल्तान एका गुजराती टीले इतके म्हणजेच जवळपास 35 ते 37 किलो अन्न फस्त करत असल्याचा उल्लेख या इतिहासकारांनी त्यांच्या गोष्टींमध्ये केला आहे. जेवण झाल्यानंतर सुल्तानला गोड खायची सवय होती. त्यांना जेवणानंतर एक किंवा दोन कटोरी गोड पदार्थ खाणे पसंत होते. ते गोड खाण्याच्या बाबतही सर्वांच्या पुढे होते.

    कारण डिर्सटमध्ये 4.6 किलो गोड भात खात होते. इतके सगळे दिवसभरात खाल्यानंतर कोणाला भूक लागणार नाही पण हे सुल्तान महमूद बेगडा यांच्याबाबतीत घडत होते. कारण रात्री अचानक लागलेल्या भूकेमुळे सुल्तान परेशान होऊ नये यासाठी त्यांच्या उशाच्या दोन्ही बाजूंना मांसाचे समोसे ठेवण्यात येत होते. यामुळे सुल्तान रात्री लागणाऱ्या भूकेला शांत करत होते.

    हे सुद्धा वाचा