Yamuna Express Waver Theft

यमुना एक्स्प्रेस वेवर मथुरा जिल्ह्यातील सुरीर परिसरात लुटारूंनी धावत्या बसमधील प्रवाशांना लुटले. या घटनेने एक्स्प्रेस वेवरील सुरक्षाव्यवस्थेची पोलखोल झाली आहे. नोएडा व्हाया आग्रा येथून हमीरपूरला जाणाऱ्या डबल डेकर बसमध्ये सोमवारी रात्री उशिरा काही जण चढले. सुरुवातीला हे प्रवासी असल्याचे वाटले. मात्र, काही वेळाने त्यांनी आपल्याकडील शस्त्रे बाहेर काढली. प्रवाशांना धाक दाखवला. त्यानंतर प्रवाशांकडील पैसे आणि दागिने लुटले आणि फरार झाले.

    मथुरा : उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वेवर सोमवारी रात्री उशिरा लुटारूंनी एका डबल डेकरमधील प्रवाशांना लुटले. जवळपास सहा ते सात शस्त्रधारी लुटारूंनी प्रवाशांकडील पैसे आणि दागिने लुटून पोबारा केला.

    यमुना एक्स्प्रेस वेवर मथुरा जिल्ह्यातील सुरीर परिसरात लुटारूंनी धावत्या बसमधील प्रवाशांना लुटले. या घटनेने एक्स्प्रेस वेवरील सुरक्षाव्यवस्थेची पोलखोल झाली आहे. नोएडा व्हाया आग्रा येथून हमीरपूरला जाणाऱ्या डबल डेकर बसमध्ये सोमवारी रात्री उशिरा काही जण चढले. सुरुवातीला हे प्रवासी असल्याचे वाटले. मात्र, काही वेळाने त्यांनी आपल्याकडील शस्त्रे बाहेर काढली. प्रवाशांना धाक दाखवला. त्यानंतर प्रवाशांकडील पैसे आणि दागिने लुटले आणि फरार झाले.

    एक्स्प्रेस वेवर बसमधील प्रवाशांना लुटल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनात खळबळ उडाली. स्थानिक पोलिस आणि आजूबाजूच्या पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. काही पुरावे हाती लागले असून, लवकरच या घटनेचा उलगडा करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.