The condition of Hindus in Bangladesh is pitiable; Like Pakistan, discrimination against Hindus is taking place here

  जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावरून परतले आहेत तेव्हापासूनच बांगलादेशात हिंदूंच्या दयनीय स्थितीबाबत वृत्त झळक आहे. पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशातही हिंदूंसोबत भेदभाव केला जात आहे. बांगलादेशातील हिंदू आता कोणत्याही स्थितीत जीव वाचवून देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे इतपत स्थिती ओढवली असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

    दिल्ली :  जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावरून परतले आहेत तेव्हापासूनच बांगलादेशात हिंदूंच्या दयनीय स्थितीबाबत वृत्त झळक आहे. पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशातही हिंदूंसोबत भेदभाव केला जात आहे. बांगलादेशातील हिंदू आता कोणत्याही स्थितीत जीव वाचवून देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे इतपत स्थिती ओढवली असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

    ही स्थिती अशीच राहिल्यास 25 वर्षात बांगलादेशात एकही हिंदू शिल्लक राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत सेंटर फॉर डेमॉक्रॅसी प्लरलिझ्म अॅण्ड ह्युमन राइट्सच्या (सीडीपीएचआर) अहवालात दावा करण्यात आला आहे. संस्थेने भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका आणि तिबेटमधील मानवाधिकाराबाबत अहवाल तयार केला आहे.

    गेल्या चार दशकात बांगलादेशातून 2.3 लाख लोकांनी पळ काढला अससल्याची माहिती ढाका युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अब्दुल बरकत यांनी दिली. सद्यस्थिती पाहू जाता प्रत्येक हिंदू देश सोडून अन्यत्र जाण्यास इच्छुक आहे. याच अहवालात पाकिस्तानातील हिंदूंच्या स्थितीवरही भाष्य करण्यात आले आहे.

    तेथेही अल्पसंख्यांकांची स्थिती चांगली नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानात हिंदूंसोबतच शीख आणि ख्रिश्चन अल्पसंख्यांकांसोबत भेदभाव केला जातो. फाळणीवेळी हिंदूंची लोकसंख्या 3.5 कोटी होती ती आता 50 ते 60 लाखांवर आली असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.