yashwant sinha

यशवंत सिन्हा यांनी ट्विट(yashwant sinha tweet) केले आहे की, गृहमंत्र्यांनी पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीतील ३० जागांपैकी २६ जागांवर दावा केला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. माझ्या माहितीप्रमाणे भाजपा २९४ पैकी ३०० जागा जिंकणार आहे.

    पश्चिम बंगालमध्ये(west bengal election) सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे(BJP) प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालमध्ये जाऊन प्रचार करत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला २०० हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान भाजपातून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे यशवंत सिन्हा यांनी यावरुन अमित शाह यांना टोला लगावला आहे.


    यशवंत सिन्हा यांनी ट्विट केले आहे की, गृहमंत्र्यांनी पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीतील ३० जागांपैकी २६ जागांवर दावा केला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. माझ्या माहितीप्रमाणे भाजपा २९४ पैकी ३०० जागा जिंकणार आहे.

    शनिवारी पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान झाले. यानंतर अमित शाह यांनी सांगितलं की, “कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बंगालमध्ये भाजपाची भगवी लाट येणार असल्याचे संकेत आहेत. पहिल्या टप्प्यात तिथे ३६ जागांवर मतदान झाले. त्यापैकी २६ जागा भाजपाला मिळतील. इतर टप्प्यात २९४ सदस्यीय पश्चिम बंगालमध्ये भाजपला २०० हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.