योगी सरकारला आली जाग, जबरदस्तीने धर्मांतर केल्यास राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाईचे दिले आदेश

जबरदस्ती धर्मांतर(Forcefully Religion Change) करणाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली(National Security Act) अटक करा आणि अशा लोकांची संपत्तीही जप्त करा, असे आदेश योगी यांनी दिले आहेत.

    लखनऊ: दिल्ली(Delhi) आणि उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) एक हजार लोकांचं जबरदस्ती धर्मांतर(Forcefully Religion Change) करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील योगी सरकार(Yogi Government) झोपेतून जागे झाले आहे. जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी योगी सरकारने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

    जबरदस्ती धर्मांतर(Forcefully Religion Change) करणाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली(National Security Act) अटक करा आणि अशा लोकांची संपत्तीही जप्त करा, असे आदेश योगी यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे धर्मांतराविरोधात उत्तर प्रदेशात कठोर कायदा लागू असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे निर्देश दिले आहेत.

    सोमवारी लखऊन पोलिसांनी जबरदस्ती धर्मांतर करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. काही लोक जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगत असल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे पोलिसांनी या रॅकेटचा भांडाफोड करून दोन जणांना अटक केली आहे. गौतम आणि जहांगीर काजमी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघेही दिल्लीच्या जामिया नगरमधील रहिवासी आहेत.

    पोलिसांनी या दोघांना पकडून कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणत असल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे गौतम हा पूर्वी हिंदूच होता. त्याने धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारला. आता तो धर्मांतर मोहीम राबवत आहे. उमरने त्याच्या सहकाऱ्याशी हात मिळवून एक हजाराहून अधिक लोकांचं धर्मांतर केलं आहे. पाकिस्तानातील गुप्तचर संस्था आयएसआयकडून पैसे घेऊन हे लोक धर्मांतराची मोहीम राबवत होते. त्याची कबुलीही त्यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.