योगींनी जाहीर केला लोकसंख्या नियंत्रणाचा अ‍ॅक्शन प्लॅन; म्हणाले…

लखनऊमध्ये (Lucknow) एका कार्यक्रमात योगी यांनी नवीन नीति जाहीर केली. यावेळी त्यांनी सांगितले की, वाढती लोकसंख्या विकासात बाढा ठरते. लोकसंख्या नियंत्रणासाठी आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहेत.

    उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी राज्यात नवी लोकसंख्या नीति (Population Control Policy) ची घोषणा केली आहे. लखनऊमध्ये (Lucknow) एका कार्यक्रमात योगी यांनी नवीन नीति जाहीर केली. यावेळी त्यांनी सांगितले की, वाढती लोकसंख्या विकासात बाढा ठरते. लोकसंख्या नियंत्रणासाठी आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहेत.

    योगी यांनी सांगितले की, या बाबत जागरुकतेची भूमिका खूप महत्वाची आहे. लोकसंख्या नीतिचा संबंध प्रत्येक नागरिकाशी जोडलेला आहे. वाढती लोकसंख्या ही गरीबीचे कारण आहे. दोन मुलांमध्येही योग्य अंतर असायला हवे. जर त्यांच्यामध्ये योग्य अंतर नसेल तर त्यांचे पोषणही चांगले होत नाही. त्यावरही परिणाम होतो. गरीबी आणि वाढती लोकसंख्या या एकमेकांशी संबंधित आहेत