योगी सरकारची चार वर्षे पूर्ण; तरी पुन्हाच त्याच योजनांचे उद्घाटन- अखिलेश यादवांची टीका

सहा मंदिरांसहीत पर्यटन स्थळांच्या विकासासाठी प्रत्येकी ५०लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.२० मार्चपासून मंदिरांच्या विकासकामाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचे चार वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणार आहे.

    लखनौ: योगी सरकारला शुक्रवारी चार वर्षे पूर्ण झाली आहेत. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा विधानसभा निवडणुका पार पडतील. या दरम्यान अयोध्या निकाल आणि विकास, लव्ह जिहाद, गोहत्या बंदी, आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई अशा अनेक प्रकरणांमुळे योगी सरकार गेले चार वर्षे सतत चर्चेत राहिले. आता पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ सरकार एका नव्या निर्णयामुळे चर्चेत आले आहे. लखनौच्या प्राचीन मंदिरांच्या डागडुजीसाठी तसेच परिसर आकर्षक करण्याच्या योजनेला योगी सरकारने हिरवा कंदिल दाखविला आहे. या योजनेला मुख्यमंत्री पर्यटन संवर्धन योजनेत सामील करण्यात आले. तसेच पर्यटन विभागाकडूनही या योजनाला प्रशासकीय आणि आर्थिक स्वीकृती मिळाली आहे.

    पर्यटन स्थळाच्या विकासासाठी ५० लाख

    सहा मंदिरांसहीत पर्यटन स्थळांच्या विकासासाठी प्रत्येकी ५०लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.२० मार्चपासून मंदिरांच्या विकासकामाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचे चार वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणार आहे.
    पुन्हा त्याच योजनांचे उद्घाटन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. ४ वर्षे लोटली असली तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने अजूनपर्यंत एकही नवीन काम केले नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा सरकार उद्घाटन केलेल्या योजनांचे उद्घाटन करीत आहेत. या सरकारने जेवढे निर्णय घेतले आहे त्यामुळे उत्तरप्रदेशच नव्हे तर देश पिछाडीवर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.