पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बोलल्याने योगी सरकारने महसूल अधिकाऱ्याला केलं निलंबित…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अवमानकारक टिपण्णी केल्याचा आरोप करत योगी सरकारने एका महसूल अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. जितेंद्र नाथ सिंह निलंबित महसूल अधिकारी महू जिल्ह्यातील सरसेना गावातील रहिवासी आहे.

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अवमानकारक टिपण्णी केल्याचा आरोप करत योगी सरकारने एका महसूल अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. जितेंद्र नाथ सिंह निलंबित महसूल अधिकारी महू जिल्ह्यातील सरसेना गावातील रहिवासी आहे.

    पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात अवमानकारक टिप्पणी केल्याची तक्रार मिळाल्यानंतर केलेल्या तपासात जितेंद्र नाथ सिंह यांच्यावरील आरोप खरे असल्याचं आढळून आलं. तसेच सरकारी सेवा नियमांचं पालन न केल्याबाबतही ते दोषी आढळले, अशी माहिती तहसील उपजिल्हाधिकारी सूरज यादव यांनी दिली आहे.

    ओडराई गावात कर्तव्यावर असलेले महसूल अधिकारी जितेंद्र नाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अवमानकारक टिप्पणी केली असून, त्यांची ही कृती सरकारी सेवा नियमावलींचे उल्लंघन करणारी आहे. यासंदर्भात तक्रार मिळाल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात आला. तपासात दोषी आढळल्याने केली कारवाई करण्यात आली, असं सूरज यादव यांनी सांगितलं.

    दरम्यान, यापूर्वीही एका अधिकाऱ्याने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींची चेष्टा करणारी पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अवमानकारक टिप्पणी केल्याबाबत मध्य प्रदेशमधील सहसंचालक स्तरावरील अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली होती.