जीव धोक्यात घालून बाइकवरून स्टंट करणं तरूणीला पडलं महागात, VIDEO व्हायरल होताच पोलिसांकडून अटक

सूरतच्या डूम्मस भागातील हा व्हिडिओ आहे. यामध्ये तरूणी बिनधास्त आणि बेफिकीर स्टंट करताना दिसत आहे. बाइक चालवताना तिनं पहिला एक होत हँन्डलवरून सोडला. त्यानंतर दोन्ही हात सोडले. तोंडावरती ना मास्क होता आणि ना जीवाच्या सुरक्षेसाठी हेल्मेट होता. परंतु हेल्मेट नसाताना देखील ती रस्त्यावर भरधाव वेगात गाडी चालवताना दिसत आहे. या स्टंटनंतर तरूणीने आपला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मात्र, हा व्हिडिओ पोस्ट करणं तिला चांगलंच महागात पडलं आहे.

  सूरत: सोशल मीडियावर एखादी गोष्ट चटकन प्रसिद्ध होऊ शकते. कारण या प्रसिद्धीला काही कारण व समस्या देखील तशीच असतात. बाइकवरून स्टंट करताना आपण अनेक तरूण आणि तरूणींना देखील पाहिलं आहे. स्टंट करणं ही काही सोपी गोष्ट नाही. यामध्ये एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. अशाच प्रकारचा एक स्टंट तरूणीने केला असून व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तिला अटक केल्याची माहिती मिळाली आहे.

  View this post on Instagram

  A post shared by _SANJU_ (@princi_sanju_99)

  सूरतच्या डूम्मस भागातील हा व्हिडिओ आहे. यामध्ये तरूणी बिनधास्त आणि बेफिकीर स्टंट करताना दिसत आहे. बाइक चालवताना तिनं पहिला एक होत हँन्डलवरून सोडला. त्यानंतर दोन्ही हात सोडले. तोंडावरती ना मास्क होता आणि ना जीवाच्या सुरक्षेसाठी हेल्मेट होता. परंतु हेल्मेट नसाताना देखील ती रस्त्यावर भरधाव वेगात गाडी चालवताना दिसत आहे. या स्टंटनंतर तरूणीने आपला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मात्र, हा व्हिडिओ पोस्ट करणं तिला चांगलंच महागात पडलं आहे.

  View this post on Instagram

  A post shared by _SANJU_ (@princi_sanju_99)

  दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या तरुणीचा शोध सुरू केला. या गाडीवरील नंबरवरून त्यांनी या तरुणीचा शोध घेतला, त्यानुसार या तरुणीचं नाव संजना असल्याची माहिती समोर आली आहे. जीव धोक्यात घालून भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे .स्टंट करण्याव्यतिरिक्त कोरोना संबंधित नियमांचं पालन न केल्यामुळे देखील पोलिसांनी तिच्याविरोधात कारवाई केली आहे.