kidnap

बाडमेरमध्ये ८ मार्चला काही जणांनी एका युवकाचं अपहरण(young man kidnapped in badner) केलं होतं. (rajasthan kidnapping)त्यानंतर आरोपी तरुणांनी पीडित तरुणाला  मारहाण केली होती. त्यानंतर आरोपींनी पीडित तरुणाला जबरदस्तीने लघवी पाजण्याचा प्रयत्न केला होता.

    बाडमेर:  राजस्थानमधील(badmer kidnapping) बाडमेरमध्ये एक विचित्र प्रकार(Rajasthan) समोर आला आहे. तिथे एका युवकाचे अपहरण करून त्याला खूप मारहाण करण्यात आली. आरोपींनी पीडित तरुणाला लोखंडी रॉडने मारल्यानंतर त्याला जबरदस्तीने लघवी पाजण्याचा प्रयत्न केला आहे. ही बातमी कळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा तपास सुरु आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,चार ते पाच युवकांनी एका तरुणाचे अपहरण करुन मारहाण केली. त्यानंतर त्याला लघवी पाजण्याचा घृणास्पद प्रकार केला आहे. आरोपींचा शोध अजुन सुरु आहे.

    बाडमेरमध्ये ८ मार्चला काही जणांनी एका युवकाचं अपहरण केलं होतं. त्यानंतर आरोपी तरुणांनी पीडित तरुणाला  मारहाण केली होती. त्यानंतर आरोपींनी पीडित तरुणाला जबरदस्तीने लघवी पाजण्याचा प्रयत्न केला होता. कहर म्हणजे त्यांनी या घडनेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी चार ते पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    व्हायरल व्हिडिओ सिणधरी पोलीस स्टेशन परिसरातील कोशलू या गावचा असल्याचे समजते. याबाबत पीडित तरुणाच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणाच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलं की, ८ मार्च रोजी हिराराम, जोगाराम आणि इतर दोन युवकांनी त्यांच्या मुलाचं अपहरण केलं होतं. त्यानंतर आरोपींनी मुलाला बेदम मारहाण केली. त्याचबरोबर त्यालाही लघवी पाजण्याचा प्रयत्नही केला आहे.

    ते पुढे म्हणाले की, आरोपींनी त्यांच्या मुलाकडून ५,००० हजार रुपये, मोबाईल, चांदीची फुलेही घेतली.याप्रकरणी पोलिसांनी डाबली येथील रहिवासी असलेल्या हिराराम आणि कोशलू येथील रहिवासी जोगाराम यांच्यासहित आणखी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरु आहे.