parrot missing

जबलपूरमध्ये (Parrot Missing In Jabalpur) एका माणसाकडचा पोपट हरवला आहे. हा पोपट शोधून काढणाऱ्याला १५ हजार रुपये(15 Thousand Reward For Finding Parrot) बक्षीस म्हणून दिले जातील, असं त्या पोपटाचा मालक असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनीअरनं सांगितलं आहे .

    मध्यप्रदेश : मध्य प्रदेशातल्या (Madhya Pradesh) जबलपूरमध्ये एक वेगळी घटना घडली आहे. जबलपूरमध्ये (Parrot Missing In Jabalpur) एका माणसाकडचा पोपट हरवला आहे. हा पोपट शोधून काढणाऱ्याला १५ हजार रुपये(15 Thousand Reward For Finding Parrot) बक्षीस म्हणून दिले जातील, असं त्या पोपटाचा मालक असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनीअरनं सांगितलं आहे . बिट्टू नावाचा हा पोपट (Bittu Parrot Missing) दोन वर्षांपासून इंजिनिअरच्या घरी राहत होता. मात्र तो पोपट बेपत्ता झाल्यानं संपूर्ण कुटुंब दु:खात आहे.

    बेपत्ता असलेला बिट्टू पोपट घरातील लोकांच्या आवाजाची नक्कल करत असायचा. तो स्वतः पिंजरा उघडायचा. सॉफ्टवेअर इंजिनिअरने पोपट शोधणाऱ्याला १५ हजार रुपयांचे बक्षीस देण्याचं म्हटलं आहे. यानंतर १५ जणांनी फोन करून पोपट आपल्या जवळ असल्याचे सांगितलं. पण त्या १५ जणांपैकी एकाकडेही बिट्टू काही सापडला नाही.

    रांझी मानेगाव येथील रहिवासी असलेले अमन चौहान हे बंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर आहेत. त्यांचे वडील श्यामवीर चौहान लष्करात आहेत. अमनच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपूर्वी बिट्टू त्यांच्या घरी आला तेव्हा तो २ महिन्यांचा होचा.त्यांनी ३६०० रुपयांना दोन पोपट विकत घेतले होते. काही दिवसानंतर एकाचा मृत्यू झाला. बिट्टू वाचला होता. मात्र आता बिट्टू पोपट २ नोव्हेंबरपासून बेपत्ता आहे.

    पिंजरा उघडल्यानंतर बिट्टू बाहेर गेला असावा, अशी भीती व्यक्त होत आहे. तेव्हापासून अमन आणि त्याचे कुटुंबीय आपल्या लाडक्या बिट्टूचा शोध घेत आहेत. बिट्टू त्यांच्या कुटुंबाचा सदस्य झाला होता. आजूबाजूच्या प्रत्येक घरात त्याचा शोध घेतला. यानंतर बिट्टूच्या जुन्या फोटोच्या आधारे हे पत्रक छापून संपूर्ण शहरात वितरित करण्यात आलं.

    अमननं पत्रकात बिट्टूचा शोध घेणाऱ्याला १५ हजार रुपयांचे बक्षीस देण्याचं लिहिलं आहे. पोपटासाठी कोणी १५ हजार कसं काय देऊ शकतं ? असा प्रश्न लोकांना पत्रक पाहून पडला आहे. गेल्या २१ दिवसांपासून अमन यांचे कुटुंबीय बिट्टूचा शोध घेत आहे.