serial rapist taxi driver punishment for 384 years

काही युवकांनी एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिला दुसऱ्या माळ्यावरून खाली फेकल्याची घटना घडली आहे.

    मथुरा: भारतात महिलांवरीच अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील (UP) मथुरा (Mathura) इथे घडली आहे. काही युवकांनी एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिला दुसऱ्या माळ्यावरून खाली फेकल्याची घटना घडली आहे.

    अनेक महिन्यापासून ३  युवक तिचा छळ करत होते. त्यात आरोपीनं सोमवारी रात्री पीडित मुलीच्या वडिलांना फोन करून बोलण्यास सांगितले. वडील काही बोलले नाहीत तेव्हा त्याने शिवीगाळ सुरू केली. रात्री आठच्या सुमारास तीन तरुणांनी (Young criminals) त्याच्या घरात प्रवेश केला आणि घरातील सदस्यांना मारहाण करण्यास सुरवात केली अशी तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे.

    घरात घुसल्यानंतर मुलीचा विनयभंग केला आणि जबरदस्तीनं तिला आपल्याबरोबर खेचण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता आरोपींनी मुलीला दुसर्‍या मजल्यावरून खाली फेकलं. जखमी अवस्थेत मुलगी खाली पडली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. रस्त्यावरील काही लोकांनी तिची मदत करत तिला रुग्णालयात (Hospital) दाखल केलं. मात्र तिच्या पाठीचा मणका तुटल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

    मथुरा पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोघांना अटक करण्यात आली आहे.