
कोलकातामधील एका २२ वर्षीय तरुणीने आपल्या ५६ वर्षीय वडिलांना हॉटेलमध्ये नेलं. तिथे ते जेवले. जेवणानंतर तिने वडिलांना दारू पाजली. त्यानंतर त्यांना जाळून तिने वडिलांची हत्या (daughter burns her father)केली.
कोलकाता : कोलकात्यामध्ये (kolkata crime)एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका २२ वर्षीय तरुणीने आपल्या ५६ वर्षीय वडिलांना हॉटेलमध्ये नेलं. तिथे ते जेवले. जेवणानंतर तिने वडिलांना दारू पाजली. त्यानंतर त्यांना जाळून तिने वडिलांची हत्या (daughter burns her father)केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी रविवारी रात्री आपल्या वडिलांसोबत बाहेर जेवायला गेली होती. त्यानंतर तिनं आपल्या वडिलांना दारू पाजली. त्यानंतर ते दोघे स्टॅन्ड रोडवर गेले. जेव्हा तरुणीचे वडील हुगली नदीच्या काठावर झोपले तेव्हा तिनं वडिलांवर रॉकेल ओतलं. त्यानंतर त्यांना जिवंत जाळलं. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. महिलेनंही आपला गुन्हा मान्य केला.
पोलीस म्हणाले की, पार्क सर्कसजवळील क्रिस्टोफर रोड येथील रहिवासी असलेल्या या आरोपी महिलेच्या विरोधात नातेवाईकाने तक्रार केली होती. त्यानंतर तिला अटक करण्यात आलं.
वडिलांना जिवंत जाळण्याचे कारण मुलीला विचारले असता ती म्हणाली की, जेव्हा ती लहान होती तेव्हाच तिच्या आईचा मृत्यू झाला. यानंतर तिचे वडील तिच्यावर अत्याचार करू लागले. मुलीच्या लग्नानंतर सगळ्या गोष्टी बंद झाल्या. मात्र लग्न टीकू न शकल्याने ती माहेरी आली. वडिलांनी पुन्हा अत्याचार करायला सुरुवात केली. याच गोष्टीला कंटाळून वडिलांना तिने जाळून मारलं.