धक्कादायक! IIT कॉलेजमधील शिक्षकांसह २५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, प्रशासनाकडून कंटेन्मेंट झोन जाहीर

मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, जोधपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शहरात ५२० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये तब्बल १४१ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या आकडेवारीवरुन शहरातील कोरोनाच्या वाढत्या स्पीडचा अंदाज येऊ शकेल. शहरातील कोरोना संक्रमण दर पुन्हा एकदा २७ टक्के झाला आहे.

    जोधपूर : राजस्थानमधील जोधपूर आयआयटी (IIT) कॉलेजमधील २५ विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या बातमीनं आयआयटीमध्ये खळबळ उडाली आहे. २५ जण पॉझिटीव्ह आढळल्याचं उघड होताच प्रशासनाने हा परिसर कंटेन्मेंट झोन (Containment Zone) जाहीर केला आहे.

    मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, जोधपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शहरात ५२० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये तब्बल १४१ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या आकडेवारीवरुन शहरातील कोरोनाच्या वाढत्या स्पीडचा अंदाज येऊ शकेल. शहरातील कोरोना संक्रमण दर पुन्हा एकदा २७ टक्के झाला आहे.

    आयआयटीमधील २५ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्या परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. जोधपूरमधील प्रत्येक भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात एकूण ९ झोन आहेत. तर ग्रामीण भागात ३८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. होळीच्या दिवशी दिवसभरात २१४ जणांना कोरोनाची लागण झाली. जोधपूरमध्ये गेल्या ३ दिवसात ४५५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.