कर्नाटकमधील भीषण अपघातात पाच ठार, मतदानाला चाललेल्या प्रवाशांवर काळाचा घाला

कर्नाटकमधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील बीजी हल्ली या भागात हा भीषण अपघात झाला. आज (रविवारी) पहाटे ही भीषण दुर्घटना घडली. या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत. तर सहा जण गंभीररित्या जखमी झालेत. जखमींना नजीकच्या इस्पितळात उपचारांसाठी हलवण्यात आलंय. त्यापैकी काहीजणांची प्रकृती ही गंभीर असल्याचं समजतंय.

कर्नाटकमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात पाच जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात हा भीषण अपघात झालाय.

कर्नाटकमधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील बीजी हल्ली या भागात हा भीषण अपघात झाला. आज (रविवारी) पहाटे ही भीषण दुर्घटना घडली. या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत. तर सहा जण गंभीररित्या जखमी झालेत. जखमींना नजीकच्या इस्पितळात उपचारांसाठी हलवण्यात आलंय. त्यापैकी काहीजणांची प्रकृती ही गंभीर असल्याचं समजतंय.

चित्रदुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रुसर जीप आणि बस यांच्यात टक्कर होऊन हा भीषण अपघात झाला. रविवारी पहाटेच्या सुमाराला हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. या अपघातात ठार झालेले सर्व प्रवासी हे रायचूर जिल्ह्यातील लिंगतूर तालुक्यातील रहिवासी होते. जखमींना बल्लारीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे सर्वजण ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करण्यासाठी आपल्या गावी जात असल्याची माहिती मिळतेय. तर ही बस बंगळुरूहून लिंगसूरकडे जात होती.