550 year old ‘mummy’ in Himachal

सुमारे 550 वर्षे जुन्या या ‘ममी’ला देव समजून लोक त्याची पूजा करतात. लोक याला जिवंत देव मानतात. भारत-तिबेट सीमेवर हिमाचलच्या लाहौल स्पीतिमधील गयू गावात मिळालेल्या या ममीचे रहस्य आजही कायम आहे. येथे मिळालेली ममी गयू गावात येऊन तपस्या करणाऱ्या लामा सांगला तेनजिंग यांची आहे. लामा यांनी साधनेत लीन होत स्वतःचे प्राण त्यागले होते असे सांगण्यात येत. तेनजिंग बसलेल्या अवस्थेत होते आणि तेव्हा त्यांचे वय केवळ 45 वर्षे होते. बसलेल्या अवस्थेतील ही एकमात्र ममी आहे. या ममीच्या वैज्ञानिक तपासणीत याचे वय 550 वर्षे आढळून आले आहे.

  सिमला : हिमाचल प्रदेशच्या गयू गावात एक 550 वर्षे जुनी ममी आहे. हे गाव स्पीति खोऱ्यातील थंड वाळवंटात समुद्रसपाटीपासून 10,499 फुटांच्या उंचीवर आहे. भारत-चीन सीमेनजीकचे हे गाव स्वतःच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते, पण या गावात 550 वर्षे जुनी ममी पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. लाहौल स्पीति खोऱ्याच्या ऐतिहासिक ताबो मठापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर भारत-चीन सीमेवरील गयू गाव वर्षातील 6-8 महिने हिमाच्छादित असल्याने संपर्कहीन असते. पण ही ममी पाहण्यासाठी तेथे देशविदेशातून पर्यटक पोहोचतात. येथील लोकांची या ममीबद्दलची श्रद्धा अगाध आहे.

  देव समजून करतात पूजा

  सुमारे 550 वर्षे जुन्या या ‘ममी’ला देव समजून लोक त्याची पूजा करतात. लोक याला जिवंत देव मानतात. भारत-तिबेट सीमेवर हिमाचलच्या लाहौल स्पीतिमधील गयू गावात मिळालेल्या या ममीचे रहस्य आजही कायम आहे. येथे मिळालेली ममी गयू गावात येऊन तपस्या करणाऱ्या लामा सांगला तेनजिंग यांची आहे. लामा यांनी साधनेत लीन होत स्वतःचे प्राण त्यागले होते असे सांगण्यात येत. तेनजिंग बसलेल्या अवस्थेत होते आणि तेव्हा त्यांचे वय केवळ 45 वर्षे होते. बसलेल्या अवस्थेतील ही एकमात्र ममी आहे. या ममीच्या वैज्ञानिक तपासणीत याचे वय 550 वर्षे आढळून आले आहे.

  रहस्य कायम

  ममी तयार करण्यासाठी एका विशेषप्रकारचा लेप मृत शरीरावर लावण्यात येतो. पण या ममीवर कुठल्याही प्रकारचा लेप लावण्यात आलेला नाही, तरीही ही ममी इतक्या वर्षांपासून सुरक्षित कशी राहिली हे रहस्य अद्याप कायम आहे. सर्वांत चकीत करणारी बाब म्हणजे या ममीचे केस आणि नखे आजही वाढत आहेत असे स्थानिक लोक सांगतात.

  गावात ठेवण्यात आली आहे

  भारत-तिबेट सीमा पोलिसांना रस्त्याच्या निर्मितीवेळी ही ममी मिळाली होती. 1975 मध्ये येथे आलेल्या भूकंपात ही ममी जमिनीत गाडली गेली होती. 1995 मध्ये आयटीबीपीच्या जवानांना रस्तेनिर्मितीवेळी ही ममी पुन्हा मिळाली. खनन करता या ममीच्या शिराला कुदळ लागल्याने रक्तदेखील निघाल्याचे बोलले जाते. 2009 पर्यंत ही ममी आयटीबीपीच्या केंद्रात ठेवण्यात आली होती. पण गर्दी होऊ लागल्याने या ममीला संबधित गावात ठेवण्यात आले. गयू गावात सिमला आणि मनाली येथून जाता येते.