पुन्हा वाढतायत मनोविकार, नैराश्यातून एकाच दिवसात ७ जणांची आत्महत्या, मनस्वास्थ जपण्याची गरज

उत्तर प्रदेशमध्ये मंगळवारी एकाच दिवसात आत्महत्येच्या ७ वेगवेगळ्या घटना घडल्यात. यातील एकच समान धागा म्हणजे प्रथमदर्शनी या सर्व आत्महत्यांचं कारण हे मानसिक आजार असल्याचं स्पष्ट झालंय. उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७ जणांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतलाय. घटना वेगवेगळ्या ठिकाणच्या असल्या तरी या सर्व आत्महत्या या कुठल्या ना कुठल्या मानसिक आजारातून किंवा नैराश्यातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. 

    गेल्या वर्षापासून कोरोनानं जगभर थैमान घातलंय. कोरोनाची असुरक्षितता आणि लॉकडाऊनने बदललेली आर्थिक गणितं यामुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झालाय. आता पुन्हा एकदा कोरोनाचं थैमान वाढायला सुरुवात झालीय. पुन्हा एकदा लॉकडाऊनची भीती मनात घर करू लागली आहे. याचा परिणाम नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर होत असल्याचं उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आत्महत्यांच्या घटनांवरून स्पष्ट झालंय.

    उत्तर प्रदेशमध्ये मंगळवारी एकाच दिवसात आत्महत्येच्या ७ वेगवेगळ्या घटना घडल्यात. यातील एकच समान धागा म्हणजे प्रथमदर्शनी या सर्व आत्महत्यांचं कारण हे मानसिक आजार असल्याचं स्पष्ट झालंय. उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७ जणांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतलाय. घटना वेगवेगळ्या ठिकाणच्या असल्या तरी या सर्व आत्महत्या या कुठल्या ना कुठल्या मानसिक आजारातून किंवा नैराश्यातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

    तबरेज खान, धर्मेंद्र मिश्रा, गीता देवी, प्रकाश हलदर, पार्थवी, चंद्रा आणि भीम अशी आत्महत्या केलेल्यांची नावं आहेत. या सर्व आत्महत्यांमागे इतर काही कारण आहे का, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. मात्र यापैकी काहींच्या सुसाईड नोटमधून तर काहींच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी हे सर्व मनोविकाराने पीडित असल्याचं स्पष्ट होतंय, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

    हे सुद्धा वाचा

    मनोविकास आहेत भयंकर 

    गेल्या वर्षी अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं डिप्रेशनमधून आत्महत्येचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मानसिक आजारांच्या चर्चेला जोर आला होता. जर मानसिक तणाव जाणवत असेल, तर अगोदर मित्र आणि नातेवाईकांशी गोष्टी शेअर करण्याचा सल्ला मनोविकार तज्ज्ञ देतात. जर त्यानेही काही फरक पडला नाही, तर तातडीने मनोविकार तज्ज्ञांनी किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.