jalore hukumdas

एका ७७ वर्षीय (77 Year Old Man Enrolls For twelfth Exam After Passing Tenth in 56th Attempt) वृद्धाने एक वेगळाच पराक्रम केला आहे.जालोर जिल्ह्यातील हुकमदास वैष्णव यांनी वयाची ७७ वर्षे पूर्ण केली आहे. त्यांनी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आता  बारावीच्या परीक्षेचा अर्जही भरला आहे.

    जालोर : राजस्थानमधील (Rajsthan) जालोरमध्ये (Jalore) एका ७७ वर्षीय (77 Year Old Man Enrolls For twelfth Exam After Passing Tenth in 56th Attempt) वृद्धाने एक वेगळाच पराक्रम केला आहे. या ७७ वर्षीय माणसाला शिक्षणाची एवढी आवड आहे की दहावीत ५६ वेळा नापास होऊनही त्याने प्रयत्न थांबवले नाही. तब्बल ५६ वेळा नापास झाल्यानंतर या व्यक्तीने ५७व्यांदा पुन्हा परीक्षा दिली आणि शेवटी ते उत्तीर्ण झाले. जालोर जिल्ह्यातील हुकमदास वैष्णव यांनी वयाची ७७ वर्षे पूर्ण केली आहे. त्यांनी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आता  बारावीच्या परीक्षेचा अर्जही भरला आहे.

    जालोर जिल्ह्यातील सरदारगड येथे राहणारे हुकमदास वैष्णव तरुणांसाठी आदर्श ठरले आहेत. हुकमदास यांनी १९६२ पासून दहावी पास होण्यासाठी प्रयत्न केले, जे २०१९ मध्ये यशस्वी झाले. हुकमदास यांना आठवी पास केल्यानंतर नोकरी मिळाली होती. पण सरकारी नोकरी मिळाल्यानंतरही त्यांची अभ्यासाची आवड कमी झाली नाही. सरकारी नोकरी मिळाल्यानंतरही त्यांनी दहावी पास करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र १९६२ ते २०१८ पर्यंत हुकमदास वैष्णव दहावीत ५६ वेळा नापास झाले. अखेर २०१९ मध्ये, हुकमदास वैष्णव ५७ व्यांदा दहावीची परीक्षा देऊन यशस्वी झाले.

    हुकुमदास वैष्णव यांची दहावी पास होण्यासाठीची धडपड आणि कथाही खूप रंजक आहे. हुकुमदास वैष्णव यांनी जालोर शहरातील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय अर्बन येथे १२वी कला वर्गातून अर्ज केला आहे. विशेष म्हणजे आता त्यांच्या नातवानेही शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

    हुकमदास यांनी सांगितले की, दहावीत पहिल्यांदा नापास झाल्यानंतरही वयाच्या १८व्या वर्षी त्यांना सरकारी नोकरी मिळाली. भूजल विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची नोकरी मिळाल्यानंतरही त्यांचे शिक्षणावरील प्रेम कमी झाले नाही. जेव्हा त्यांनी दहावीचा फॉर्म भरला तेव्हा मित्रांनी त्यांना नोकरी लागली आहे, आता अभ्यास सोड, असे सांगितले. मात्र हुकमदास वैष्णव ७७ वर्षांचे झाले असतील, पण त्यांची अभ्यासाची आवड आजही कायम आहे. हुकुमदास वैष्णव यांनी आता बारावी उत्तीर्ण होण्यासाठी अर्ज केला आहे.