३ दिवसांत ८ आमदारांनी सोडला पक्ष, भाजपातील गळती सुरुच, दोन मंत्र्यांनंतर आज आमदार मुकेश वर्मा यांचा राजीनामा

या सगळ्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. यात पक्षाला लागलेली गळती, प्रचाराचे मुद्दे, प्रक्रिया यावर चर्चा अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कुठल्या मतदरारसंघातून निवडणूक लढवणार, हेही आजच्या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे. यासह ३०० उमेदवारांच्या नावांवरही शिक्कामोर्तब होण्याची आशा आहे.

  लखनौ – उ. प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषमा झाल्यानंतर सत्ताधारी भाजपाच्या गडाला तडे पडणअणयास सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांत राज्याचे दोन मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि वनमंत्री दारासिंह चौहान यांनी पक्ष सोडला आहे. हे दोघेही भाजपात जाण्याची शक्यता आहे. तर गुरुवारी शिकोहाबादचे आमदार मुकेश वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

  गेल्या तीन दिवसांत दोन मंत्र्यांसह ८ आमदारांनी भाजपाला रामराम केला आहे.

  मुकेश वर्मा यांनीही आपल्या राजीनाम्याच्या पत्रात दारासिंह आणि स्वामीप्रसाद मौर्य यांच्याप्रमाणेच, सरकारने दलित, वंचित आणि अल्पसंख्याकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. यामुळे भाजपाच्या डेऱ्यात चिंतेचे वातावरण आहे. तर दुरीकडे सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या आत्मविश्वासात वाढ होताना दिसते आहे.

  भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक

  या सगळ्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. यात पक्षाला लागलेली गळती, प्रचाराचे मुद्दे, प्रक्रिया यावर चर्चा अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कुठल्या मतदरारसंघातून निवडणूक लढवणार, हेही आजच्या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे. यासह ३०० उमेदवारांच्या नावांवरही शिक्कामोर्तब होण्याची आशा आहे.

  या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मित शाह, योगी आदित्यनाथ, जे पी नड्डा, राजनाथ सिंह, धर्मेंद्र प्रधान, अनुराग ठाकूर आणि स्वतंत्र देव हे उपस्थित असतील. यात मोदी, राजनाथ सिंह आणि नड्डा हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित असणार आहेत.