बापरे ! पंजाबातील ८१ टक्के सँपलमध्ये युकेचा कोरोना स्ट्रेन, लवकरात लवकर लस घेण्याचं आवाहन

देशातील महाराष्ट्रासह अनेक राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा आपलं जाळं पसरायला सुरुवात केलीय. पंजाबमध्ये सरकारनं एकूण ४०१ सँपल तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी ८१ टक्के सँपल्समध्ये आढळलेला कोरोनाचा विषाणूू हा युकेतील नव्या स्ट्रेनचा असल्याचं स्पष्ट झाल्यामुळं सर्वांनाच धक्का बसलाय. हा विषाणू आधीच्या विषाणूप्रमाणेच असला तरी त्याची पसरण्याची क्षमता आधीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कोरोना पसरण्याचा वेग वाढणार असल्याचं  सांगितलं जातंय. नागरिकांना लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केलंय. 

    नव्या वर्षाच्या सुरुवातीला नियंत्रणात आलेला कोरोना आता पुन्हा वेगानं पसरायला सुरुवात झालीय. देशातील सर्वच राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून पंजाबात टेस्ट केलेल्या सँपलपैकी बहुतांश सँपलमध्ये धोकादायक समजला जाणारा नवा स्ट्रेन सापडल्यामुळे खळबळ उडालीय.

    देशातील महाराष्ट्रासह अनेक राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा आपलं जाळं पसरायला सुरुवात केलीय. पंजाबमध्ये सरकारनं एकूण ४०१ सँपल तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी ८१ टक्के सँपल्समध्ये आढळलेला कोरोनाचा विषाणूू हा युकेतील नव्या स्ट्रेनचा असल्याचं स्पष्ट झाल्यामुळं सर्वांनाच धक्का बसलाय. हा विषाणू आधीच्या विषाणूप्रमाणेच असला तरी त्याची पसरण्याची क्षमता आधीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कोरोना पसरण्याचा वेग वाढणार असल्याचं  सांगितलं जातंय. नागरिकांना लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केलंय.

    दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. विशेष म्हणजे सोमवारी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दगावण्याचा आकडाही महाराष्ट्रात नोंदवला गेला. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ४३,५९० रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल नागपूरमध्ये ३३,१६०, मुंबईत २६,५९९, ठाण्यात २२,५१३, नाशिकमध्ये १५,७१० तर औरंगाबादमध्ये १५,३८० रुग्ण सध्या कोरोनाग्रस्त आहेत.

    कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. नागरिकांनी काळजी घेतली नाही, तर नाईलाजाचे लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलाय. नागरिकांनी मास्क लावणे, वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझरचा उपयोग करणे आणि गर्दी न करणे हे नियम पाळले, तरच कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे.