A 13-month-old girl in Jharkhand has recently been diagnosed with fetal malformations

तिच्या पोटाची ही समस्या काही तरी वेगळीच असल्याचे तिच्या पालकांना जाणवले आणि ते अखेर टाटीसिलवे इथल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेले. तिथल्या डॉक्टर्सनी 13 महिन्यांच्या त्या मुलीची अल्ट्रासाउंड चाचणी केली. त्यात त्यांना काही तरी गडबड असल्याचा अंदाज आला. त्यानंतर सोनोग्राफी, सीटी स्कॅन आणि एमआरआय या सगळ्या चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांचा अंदाज खरा असल्याचे स्पष्ट झाले. त्या मुलीच्या पोटात गर्भ वाढत असल्यामुळे तिचे पोट फुगत चालले होते आणि तिला वेदना होत होत्या, असे त्यातून दिसून आले.

    रांची : झारखंडमधील एका 13 महिन्यांच्या मुलीच्या पोटात गर्भ वाढत असल्याची दुर्मीळ घटना नुकतीच समोर आली आहे. गिरिडीहमधील या मुलीचे पोट फुगण्याची समस्या ती दोन महिन्यांची होती तेव्हापासून जाणवत होती. सुरुवातीला काही घरगुती उपचारांनंतरही तिची ही समस्या वाढतच गेली आणि वेदनांमुळे तिचे रडणे थांबेना.

    तिच्या पोटाची ही समस्या काही तरी वेगळीच असल्याचे तिच्या पालकांना जाणवले आणि ते अखेर टाटीसिलवे इथल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेले. तिथल्या डॉक्टर्सनी 13 महिन्यांच्या त्या मुलीची अल्ट्रासाउंड चाचणी केली. त्यात त्यांना काही तरी गडबड असल्याचा अंदाज आला. त्यानंतर सोनोग्राफी, सीटी स्कॅन आणि एमआरआय या सगळ्या चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांचा अंदाज खरा असल्याचे स्पष्ट झाले. त्या मुलीच्या पोटात गर्भ वाढत असल्यामुळे तिचे पोट फुगत चालले होते आणि तिला वेदना होत होत्या, असे त्यातून दिसून आले.

    डॉ. आलोक चंद्रप्रकाश आणि त्यांच्या टीमने सर्जरी करून त्या मुलीच्या पोटातला 250 ग्रॅम वजनाचा गर्भ बाहेर काढला. त्यानंतर त्या मुलीच्या वेदना थांबल्या. आता तिची प्रकृती उत्तम असून, तिला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. वैद्यकीय भाषेत या प्रकाराला ‘फीटस इन फिटू’ म्हणजेच गर्भाच्या आत आणखी एक गर्भ असे म्हटले जाते.

    ही अत्यंत दुर्मीळ घटना असून, जगभरात आतापर्यंत अशा प्रकारच्या केवळ 200 घटना घडल्याची नोंद झाली आहे. भारतात अशा पाच-सहा घटना घडल्या आहेत. 50 लाख बाळांमागे एका बाळाच्या बाबतीत असे घडू शकते, असे वैद्यकीय शास्त्र सांगते.