rajnikant

रजनीकांत (Rajnikanth) यांना हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कोव्हिड-१९ची कोणतीही लक्षण आढळून आली नाहीत, पण रक्तदाबाचा काही प्रमाणात त्रास आढळून आला आहे आणि त्यामुळे पुढील देखरेखीसाठी त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे.

हैदराबाद : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हैदराबादमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. नयनतारा आणि रजनीकांत त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते हैदराबादमध्ये होते. परंतु अन्नाथे (Annaatthe) या सिनेमाचं शूटिंग सुरू असताना २२ डिसेंबरला रजनीकांत यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांना हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कोव्हिड-१९ची कोणतीही लक्षण आढळून आली नाहीत, पण रक्तदाबाचा काही प्रमाणात त्रास आढळून आला आहे आणि त्यामुळे पुढील देखरेखीसाठी त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे.