A fine of Rs. 300 if the housemaid uses the lift; Everyone was annoyed to see the notice in the Hi-Fi Society in Hyderabad

जात-पात, धर्म, वर्ग किंवा व्यवसाय यावरून लोकांच्या मानसिकतेत आजही भेद आढळून येतो. सध्या या गोष्टीचा प्रत्यय लिफ्टच्या बाहेरील चर्चेत असलेली एक पाटी देत आहे. सध्या सोशल मीडियावर एक पाटी खूप वायरल होत आहे. या पाटीवर साधारणपणे कुठलीही जनहीतार्थ माहिती किंवा सूचना लिहिली नसून यावर एक वादग्रस्त विधान लिहिले आहे. या पाटीवर लिहिले आहे की, मोलकरीण, चालक किंवा डिलिव्हरी बॉइजनी जर मुख्य लिफ्ट वापरल्यास 300 रुपयांचा दंड आकारला जाईल. पाटीवरील ही सूचना पाहिल्यावर अनेकांच्या मनात संताप निर्माण होईल(A fine of Rs. 300 if the housemaid uses the lift; Everyone was annoyed to see the notice in the Hi-Fi Society in Hyderabad).

    हैदराबाद : जात-पात, धर्म, वर्ग किंवा व्यवसाय यावरून लोकांच्या मानसिकतेत आजही भेद आढळून येतो. सध्या या गोष्टीचा प्रत्यय लिफ्टच्या बाहेरील चर्चेत असलेली एक पाटी देत आहे. सध्या सोशल मीडियावर एक पाटी खूप वायरल होत आहे. या पाटीवर साधारणपणे कुठलीही जनहीतार्थ माहिती किंवा सूचना लिहिली नसून यावर एक वादग्रस्त विधान लिहिले आहे. या पाटीवर लिहिले आहे की, मोलकरीण, चालक किंवा डिलिव्हरी बॉइजनी जर मुख्य लिफ्ट वापरल्यास 300 रुपयांचा दंड आकारला जाईल. पाटीवरील ही सूचना पाहिल्यावर अनेकांच्या मनात संताप निर्माण होईल(A fine of Rs. 300 if the housemaid uses the lift; Everyone was annoyed to see the notice in the Hi-Fi Society in Hyderabad).

    एका फोटोजर्नलिस्टने त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून ही पाटी पोस्ट केली आहे. ही पाटी हैदराबादच्या कुठल्यातरी लिफ्ट बाहेर लावलेली आढळली. खरं तर या पाटीवरून जनसामान्यातून रोष व्यक्त केला जात आहे.

    मोलकरीण, चालक किंवा डिलीव्हरी बॉइज हे समाजाचा अविभाज्य घटक आहे. त्यांच्यासोबत होत असलेला हा दुरव्यव्हार अशोभनीय आहे. जिथे एकिकडे आपण विकासाच्या दिशेने पावले टाकत आहोत मात्र, दुसरीकडे अशा घटनेमुळे वैचारिक मानसिकतेत अधोगती दिसून येत आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022