A lawyer arguing in Sanskrit

जगभरात सुमारे 6,900 भाषांचा वापर केला जातो. भाषेशिवाय आम्ही आमचे कुठलेच काम किंवा भावना सहजपणे इतरांना सांगू शकत नाही. काही अशाचप्रकारची भाषा आहे संस्कृत जी जगातील सर्वात जुनी भाषा आहे. संस्कृतला देववाणी किंवा सुरभारती देखील म्हटले जाते. पण बदलत्या काळात संस्कृत भाषेचा दैनंदिन जीवनातील वापर कमी होत चालला आहे. घटनेच्या आठव्या कलमात नोंद 22 भाषांमध्ये आता संस्कृतची ओळख सर्वात कमी बोलली जाणारी भाषा म्हणून राहिली आहे.

    वाराणसी : जगभरात सुमारे 6,900 भाषांचा वापर केला जातो. भाषेशिवाय आम्ही आमचे कुठलेच काम किंवा भावना सहजपणे इतरांना सांगू शकत नाही. काही अशाचप्रकारची भाषा आहे संस्कृत जी जगातील सर्वात जुनी भाषा आहे. संस्कृतला देववाणी किंवा सुरभारती देखील म्हटले जाते. पण बदलत्या काळात संस्कृत भाषेचा दैनंदिन जीवनातील वापर कमी होत चालला आहे. घटनेच्या आठव्या कलमात नोंद 22 भाषांमध्ये आता संस्कृतची ओळख सर्वात कमी बोलली जाणारी भाषा म्हणून राहिली आहे.

    देववाणी संस्कृतला पुन्हा बोली भाषा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या लोकसभा मतदारसंघातील एका वकीलाने अनेक दशकांपासून एक अनोखी मोहीम राबविली आहे. देशभरातील न्यायालयांमध्ये वकील बहुतांशी हिंदी किंवा इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषेचा वापर करतात. पण वाराणसीतील हा वकील न्यायालयाशी संबंधित प्रत्येक कामकाजात संस्कृतचा वापर करतो. या वकीलाचे नाव आचार्य श्याम उपाध्याय असे आहे.

    श्याम उपाध्याय सुमारे 42 वर्षांपासून स्वतःची सर्व कामे संस्कृत भाषेच्या माध्यमातून करत आहेत. पत्र लिखाणापासून न्यायालयात न्यायाधीशासमोर युक्तिवाद मांडण्यासाठी देखील हा वकील संस्कृत भाषेचाच वापर करत आहे. संस्कृत भाषेवरील प्रेमामागे आपले वडील कारणीभूत असल्याचे आचार्य श्याम उपाध्याय सांगतात. न्यायालयात कुठलेच काम संस्कृत भाषेत का होत नाही असा विचार लहानपणी श्याम यांच्या मनात आला होता. तेव्हापासूनच त्यांनी वकील होत न्यायालयात संस्कृत भाषेचा वापर करण्याचा निर्धार केला होता.

    आचार्य श्याम उपाध्याय अशील संबंधित कागदपत्रे संस्कृत भाषेत लिहून मांडायचे तेव्हा न्यायाधीश हैराण व्हायचे. वाराणसीच्या न्यायालयात नवा न्यायाधीश रुजू झाल्यावर तो श्याम उपाध्याय याची भाषाशैली पाहून दंग होतो. वकील आचार्य श्याम उपाध्याय काळ्या रंगाचा कोट परिधान करण्यासाठी कपाळावर त्रिपुंड आणि टिळा लावतात. उपाध्याय न्यायालयीन कामकाजासाठी पोहोचलेल्या लोकांनाही अत्यंत सोप्या पद्धतीने पण संस्कृत भाषेतच त्यांच्या समस्यांचे निराकरण करतात.