A photo of a terrorist holding a 'Quran' in a textbook; Riots in Telangana
T'gana govt urged to delete 'Islamophobic' content from school textbook.

इस्लामिक कट्टरतावाद दर्शवण्यासाठी एका हातात हत्यार आणि दुसऱ्या हातात 'कुराण' असलेल्या एका दहशतवाद्याचा फोटो पाठ्यपुस्तकात वापरण्यात आल्याचे समोर आल्यानंतर तेलंगणात एकच गदारोळ सुरू झाला आहे. इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र (इंग्रजी माध्यम) विषयाच्या पुस्तकातील 'प्रश्न बँके'त या फोटोचा वापर करण्यात आला आहे. मात्र, ही बाब समोर आल्यानंतर तत्काळ हा कंटेन्ट हटवण्याचे आदेश तेलंगणा सरकारने दिले आहेत.

    हैदराबाद : इस्लामिक कट्टरतावाद दर्शवण्यासाठी एका हातात हत्यार आणि दुसऱ्या हातात ‘कुराण’ असलेल्या एका दहशतवाद्याचा फोटो पाठ्यपुस्तकात वापरण्यात आल्याचे समोर आल्यानंतर तेलंगणात एकच गदारोळ सुरू झाला आहे. इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र (इंग्रजी माध्यम) विषयाच्या पुस्तकातील ‘प्रश्न बँके’त या फोटोचा वापर करण्यात आला आहे. मात्र, ही बाब समोर आल्यानंतर तत्काळ हा कंटेन्ट हटवण्याचे आदेश तेलंगणा सरकारने दिले आहेत.

    इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात ‘इस्लामिक कट्टरतावाद’ दर्शवण्यासाठी वापरण्यात आलेला हा फोटो तत्काळ हटवण्याची मागणी ‘स्टुडंटस् इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ (एसआयओ) कडून करण्यात आली होती. पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांसमोर चुकीची प्रतिमा तयार होत असल्याचे सांगत एसआयओने या फोटोला तीव्र विरोध केला आहे. या फोटोत एक दहशतवादी आपल्या उजव्या हातात एक रॉकेट लॉन्चर घेऊन उभा आहे तर दुसऱ्या हातात मुस्लीम पवित्र ग्रंथ ‘कुराण’ची प्रत दिसत आहे. हा फोटो ‘राष्ट्रीय आंदोलन-अंतिम चरण 1919-1947’ अध्यायात प्रकाशित करण्यात आले होते.

    एसआयओ या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. तल्हा फैयाजुद्दीन यांनी अशा प्रकारे ‘इस्लामोफोबिक’ कंटेन्ट तयार करून प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकाची निंदा केली आहे. त्यांनी राज्याचे शिक्षणमंत्री पी. सबिता इंद्रा रेड्डी यांच्याकडे बेजबाबदार प्रकाशकावर कारवाई करण्याची मागणीही केली. अशा प्रकारचा कंटेन्ट ‘मुस्लीम समाजाप्रती रुढीवादी, घृणास्पद आणि इस्लामोफोबिक दृष्टिकोण निर्माण आणि प्रचार करणारा असल्याचे डॉ. फैयाजुद्दीन यांनी म्हटले. शैक्षणिक संस्था आणि पाठ्यपुस्तकांतून विद्यार्थ्यांना शांतीचे धडे दिले जायला हवेत, यावर त्यांनी जोर दिला. पाठ्यपुस्तकातील हा मजकूर त्वरीत हटवून ही पुस्तकं नव्यानं प्रकाशित करण्यात यावीत, अशी मागणी एसआयओकडून करण्यात आली आहे.