पोलीस वाहन आणि कारची जोरदार धडक ; ११ जखमी तर एकाचा मृत्यू

पोलीस वाहन कार्यरत कर्मचाऱ्यांनासहित तिरुवन्नमलाई पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दिशेने रवाना झाली होती. परंतु सकाळी ८.३० च्या सुमारास चेंगामहून गुडियाथॅमला जात असलेल्या कारला पोलीस वाहनाची जोरदार धडक झाली.

    तामीळनाडू : तामीळनाडूमध्ये एक पोलीस वाहन आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (शुक्रवार) तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील आर्णीजवळील कन्नमंगलम गावात सकाळच्या दरम्यान घडली. या घटनेमध्ये ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला असून ११ जण गंभीर जखमी झाले आहेत.

    कन्नमंगलम पोलीसांच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस वाहन कार्यरत कर्मचाऱ्यांनासहित तिरुवन्नमलाई पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दिशेने रवाना झाली होती. परंतु सकाळी ८.३० च्या सुमारास चेंगामहून गुडियाथॅमला जात असलेल्या कारला पोलीस वाहनाची जोरदार धडक झाली. यामुळे कारमध्ये बसलेल्या चार जणांचा गंभीर अपघात झाला.

    दरम्यान, या अपघातात जवळपास आठ पोलीस कर्मचारी आणि कारमधील तीन प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच जखमी झालेले पोलीस कर्मचारी आणि कारमधील प्रवाश्यांना तात्काळ शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    मात्र, या अपघाताची नोंद अद्यापही करण्यात आलेली नाहीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाश्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत पुढील चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.