भावांची भांडणं सोडवायला गेलेल्या पोलिसाचीच गोळ्या घालून हत्या, बटाट्याच्या शेतीवरून सुरु होता वाद

उत्तर प्रदेशातील आग्र्यात दोन भावांमध्ये शेतीच्या वादातून भांडणं सुरू होती. बटाटा पिकाच्या काढणीनंतर त्याच्या वाटपावरून हे वाद सुरू होते. या दरम्यान एका भावाने फोन करून पोलिसांत तक्रार दिली. याची दखल घेत एक पोलीस उपनिरीक्षक तातडीने ही भांडणं सोडवण्यासाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत एक पोलीस कॉन्स्टेबलदेखील होते. याचा राग आल्यामुळे दुसऱ्या भावाने थेट पोलीस उपनिरीक्षकांवरच गोळ्या झाडल्या. 

    दोन भावांच्या भांडणात एका पोलीस अधिकाऱ्याचा बळी गेलाय. उत्तर प्रदेशमधल्या आग्र्यात ही घटना घडलीय. त्यामुळं सगळीकडं एकच खळबळ उडालीय.

    उत्तर प्रदेशातील आग्र्यात दोन भावांमध्ये शेतीच्या वादातून भांडणं सुरू होती. बटाटा पिकाच्या काढणीनंतर त्याच्या वाटपावरून हे वाद सुरू होते. या दरम्यान एका भावाने फोन करून पोलिसांत तक्रार दिली. याची दखल घेत एक पोलीस उपनिरीक्षक तातडीने ही भांडणं सोडवण्यासाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत एक पोलीस कॉन्स्टेबलदेखील होते. याचा राग आल्यामुळे दुसऱ्या भावाने थेट पोलीस उपनिरीक्षकांवरच गोळ्या झाडल्या.

    प्रशांत यादव असं या पोलिस अधिकाऱ्याचं नाव असून ते ३५ वर्षांचे होते. आग्र्याच्या खंदौली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. विश्वनाथ आणि शिवनाथ या दोन भावांमध्ये शेतीच्या कारणातून वाद सुरू होते. बटाट्याच्या शेतीवरून हे वाद विकोपाला गेले. शिवनाथनं पोलीस स्थानकात फोन करून याची माहिती दिली आणि पोलिसांची मदत मागितली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक यादव त्या ठिकाणी हजर झाले. मात्र त्यानंतर विश्वनाथनं रागाच्या भरात गोळ्या घालून पोलीस निरीक्षकांची हत्या केली.

    प्रशांत हे बुलंदशहरचे मूळ निवासी असून २०१५ साली पोलीस दलात रुजू झाले होते. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.