इंदूरहून पुण्याकडे येणाऱ्या बसला भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र महामंडळाची बस सकाळी ७.३० च्या सुमारास इंदूरहून पुण्याकडे निघाली होती. त्यावेळी बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि बस थेट खलघाट संजय सेतू पुलावरून २५ फूट नर्मदा नदीत कोसळली. यामध्ये बसमधील १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

    भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) धार जिल्ह्यातील खलघाट येथे प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत (Narmada River) कोसळली (Bus Accident) आहे. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी १० वाजण्याचा सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस इंदूरहून पुण्याकडे (Indore-Pune Bus) निघाली होती. तांत्रिक बिघाडामुळे (Technical Failure) हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेवेळी बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह ५० हून अधिक लोक प्रवास करत होते.

    अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र राज्य परिवहनची असून, तर १० ते १२ प्रवासी बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून बसमध्ये पुण्यातील अनेक जण असल्याचे सांगितले जात आहे.

    महाराष्ट्र महामंडळाची (MSRTC) ही बस सकाळी ७.३० च्या सुमारास इंदूरहून पुण्याकडे निघाली होती. त्यावेळी बसमध्ये अचानक काही तांत्रिक बिघाड झाला आणि बस थेट खलघाट संजय सेतू पुलावरून २५ फूट नर्मदा नदीत कोसळली. यामध्ये बसमधील १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आल्याचे शिवराज सरकारमधील कॅबिनेट मंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांनी सांगितले आहे.