A tourist destination like Switzerland to be built in Ladakh, thousands of jobs will be available

भारतात पर्यटन स्थळ तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. पर्यटन आणि रोजगार दोन्ही वाढवण्यासाठी प्रशासन त्यावर नियोजन करत आहे. गेल्या वर्षी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर केंद्र सरकार(Central Government) जम्मू काश्मीरवर(Jammu-Kashmir) लक्ष केंद्रित करत आहे.

लडाख : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखमधील जोझिला बोगदा (Zojila Tunnel) जेड-मोडच्या मध्ये असणाऱ्या १८ किलोमीटरच्या पट्ट्यात पर्यटन स्थळ बनवलं जाणार आहे. स्विझर्लंडमधील(Switzerland) दावोस(Davos) प्रमाणे पर्यटन स्थळ लडाखमध्ये तयार केलं जाणार असून, पर्यटकांना याचा मोठा लाभ होणार आहे.

भारतात पर्यटन स्थळ तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. पर्यटन आणि रोजगार दोन्ही वाढवण्यासाठी प्रशासन त्यावर नियोजन करत आहे. गेल्या वर्षी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर केंद्र सरकार(Central Government) जम्मू काश्मीरवर(Jammu-Kashmir) लक्ष केंद्रित करत आहे. मागील वर्षी जम्मू काश्मीरचे विभाजन करून नवीन लडाख(Ladakh) व जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. त्यानंतर आता सरकारने लडाखवर विशेष लक्ष केंद्रित केलं असून लडाखमध्ये पर्यटन स्थळ विकसित केलं जाणार आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या असून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांबरोबर या संदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत.

रोजगाराच्या संधी निर्माण होणार

या टुरिस्ट स्टेशनचा स्थानिकांना मोठा फायदा होणार असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार असून ही योजना जागतिक दर्जाची असणार आहे. दावोसप्रमाणे एक जागतिक दर्जाचं होमटाउन आम्ही या ठिकाणी तयार करणार असल्याचं देखील गडकरी यांनी म्हटलं. जोझिला दर्रा हा समुद्रासपाटीपासून श्रीनगर-करगिल-लेह मार्गावर ११,५७८ मीटर उंचीवर आहे.

पुढील ६ वर्षांत पूर्ण होणार हा प्रोजेक्ट

नितीन गडकरी यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं, पुढील सहा वर्षांमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या हिवाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यानं लेहचा देशाच्या इतर भागाशी संपर्क तुटतो. गडकरी यांनी जोझिला बोगद्याच्या निर्मितीला सुरुवात केलेली आहे. ऑकटोबर महिन्यात या बोगद्याच काम सुरु झालं असून यामुळं १२ महिने श्रीनगर आणि लेहमधील रस्ता सुरु राहणार आहे. सध्या यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या असून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांबरोबर(Lieutenant Governors) या संदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत. याचबरोबर जमीन ही इक्विटी कॅपिटल तत्त्वावर घेतली जाणार आहे. या टुरिस्ट स्टेशनचे डिझाईन खास स्विझर्लंडमधील आर्किटेक्टकडून तयार करून घेतलं जाणार आहे.