संपूर्ण स्वयंपाक घर सांभाळणाऱ्या ‘स्वयंपाकी पुरुषांचं गाव’ ; इतक्या वर्षापासूनची आहे परंपरा

आधीच्या काळात शेतीची कामं करणं कठीण होतं त्यामुळे या गावातील पुरुषांनी स्वत: हून शेतीचं काम स्वीकारलं. त्या काळात नोकऱ्याही फारशा नव्हत्या. त्यामुळे पुरुषांनी स्वयंपाकी होण्याचा निर्णय घेतला आणि त्याचाच ते व्यवसायही करतात. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचं साधनही मिळालं

    पुदुचेरी: स्वयंपाकघर आणि महिला हे समीकरण आपल्याला नवीन नाही. पण अलीकडच्या काळात ही परिस्थिती बदललेली आहे. आजकाल कुटुंबामध्ये दोघे नवरा बायको वर्किंग असतात. त्यामुळे अनेक घरात पुरुष स्वतः हून स्वयंपाक घरातील कामात पुढाकर घेताना दिसतात. मात्र अजूनही महिलांसारखे संपूर्ण स्वयंपाक घर सांभाळताना दिसत नाहीत. परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल,५०० वर्षांपासून घरातलं स्वयंपाकघर पुरूष सांभाळत आहेत.

    पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात कलायुर नावाच्या गावात गेल्या ५०० वर्षांपासून पुरूष स्वयंपाक घर सांभाळताना दिसत आहे. त्या गावाला स्वयंपाकी पुरुषांचं गाव (Village of Cooks) या नावानेच ओळखलं जातं. पुदुच्चेरीपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावामध्ये ८० घरं आहेत या प्रत्येक घरात तुम्हाला एक उत्तम शेफ भेटेल. हे शेफ इतके तयार आहे की त्यांच्या हातचेस्वादिष्ट पदार्थ खाल्ले तर तुम्ही थक्क व्हाल.

    अहवालानुसार या गावातले पुरुष घरात वडिलांच्या हाताखाली स्वयंपाक शिकत नाहीत तर गावातील मुख्य शेफ (Chief Chef) त्यांना जवळजवळ १० वर्षे स्वयंपाक कसा करायचा याचं ट्रेनिंग देतो. दक्षिण भारतीय सगळ्या रेसिपींचं ट्रेनिंग हा शेफ आपल्या गावातल्या कूकना देतो. या गावात २०० कूक आहेत. त्या परिसरातील लग्न, इतर समारंभ आणि पार्ट्यांमध्ये हे कूकच जेवळ तयार करतात. हे सगळे मिळून एकावेळी १ हजार माणसांसाठी जेवण तयार करू शकतात.

    आधीच्या काळात शेतीची कामं करणं कठीण होतं त्यामुळे या गावातील पुरुषांनी स्वत: हून शेतीचं काम स्वीकारलं. त्या काळात नोकऱ्याही फारशा नव्हत्या. त्यामुळे पुरुषांनी स्वयंपाकी होण्याचा निर्णय घेतला आणि त्याचाच ते व्यवसायही करतात. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचं साधनही मिळालं. सध्या शहरात पुरुषांना महिलांच्या कामाबदद्ल आदर आहे. महिलाही वेगवेगळ्या क्षेत्रात मोठमोठ्या पदांवर कामं करतात त्यामुळे घरातील कामं दोघांनी मिळून करायची हे दोघांना माहीत असतं. त्यामुळे सामान भरण्यापासून ते रविवारच्या साफसफाईपर्यंत पुरूष घरातली सगळी कामं करतात. एखाद्या रविवारी बायकोला आराम मिळावा म्हणून ते एखादी रेसिपी तयार करतात.