महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी राजकीय नेत्यांसह अतिरिक्त एसपी देखील चौकशीच्या घेऱ्यात

यूपी पोलिसांतील एडिशनल एसपी ओपी पांडे चौकशीच्या घेऱ्यात आले आहेत. प्रयागराज पोलीस लवकरच पांडे यांची चौकशी करु शकताच. पांडे यांच्यासोबतच समाजवादी पक्षाचे नेते इंदु प्रकाश मिश्रा आणि भाजप नेते सुशील मिश्रा यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

    लखनऊ: अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी प्रयागराज पोलिसांनी राजकीय पक्षांशी संबंधित लोक, गिरी यांच्यासोबतचे कार्यकर्ते यांच्यासह या प्रकरणी अतिरिक्त एसपीना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

    सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपी पोलिसांतील एडिशनल एसपी ओपी पांडे चौकशीच्या घेऱ्यात आले आहेत. प्रयागराज पोलीस लवकरच पांडे यांची चौकशी करु शकताच. पांडे यांच्यासोबतच समाजवादी पक्षाचे नेते इंदु प्रकाश मिश्रा आणि भाजप नेते सुशील मिश्रा यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

    इंदु प्रकाश मिश्रा आणि नेते सुशील मिश्रा हे दोघे महंतांचे निकटवर्तीय मानले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार ओपी पांडे यांनीच महंत नरेंद्र गिरी आणि शिष्य आनंद गिरी यांच्यात मध्यस्थी केली होती. या मध्यस्थीच्या वेळी इंदु प्रकाश मिश्रा आणि सुशील मिश्रा हेही होते, असंही सांगण्यात आलंय. दरम्यान महंत नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्यातील वाद मध्यस्थीनंतर संपुष्टात आला की, कायम होता, याचा तपास पोलीस करत असल्याचे समजते.

    दुसरीकडे आनंद गिरी याने महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येची शक्यता नाकारली. तसेच मठ आणि मंदिराजवळ असलेली संपत्ती हडपण्यासाठी महंत नरेंद्र गिरी यांची हत्या झाली. या कटात अनेक मोठे मासे गुंतलेले असू शकतात. हा कोट्यवधींचा खेळ आहे, असेही आनंद गिरी याने पोलिसांना सांगितले आहे.