VIDEO : अण्णाद्रमुकच्या उमेदवाराचा अनोखा प्रचार, धुतले जनतेचे कपडे, दिलं हे आश्वासन

तमिळनाडूमधल्या नागपट्टणममधील अण्णा द्रमुकचे उमेदवार थंगा काथीवरन यांनी आपल्या प्रचारासाठी एक अनोखी शक्कल लढवलीय. थंगा यांनी मतदारसंघात जाऊन थेट मतदारांचे कपडे धुवायलाच सुरुवात केलीय. मतदारसंघातील एका चौकात थंगा यांनी ठाण मांडलं आणि थेट कपडे धुवायलाच सुरुवात केली. हे पाहून मतदारही अवाक् झाले आणि त्यांनी हा अनोखा प्रचार पाहण्यासाठी एकच गर्दी केली.

    देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा माहौल आहे. तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्यात प्रमुख लढत असून दोन्ही पक्षांनी सध्या जोरदार प्रचाराला सुरुवात केलीय.

    तमिळनाडूमधल्या नागपट्टणममधील अण्णा द्रमुकचे उमेदवार थंगा काथीवरन यांनी आपल्या प्रचारासाठी एक अनोखी शक्कल लढवलीय. थंगा यांनी मतदारसंघात जाऊन थेट मतदारांचे कपडे धुवायलाच सुरुवात केलीय. मतदारसंघातील एका चौकात थंगा यांनी ठाण मांडलं आणि थेट कपडे धुवायलाच सुरुवात केली. हे पाहून मतदारही अवाक् झाले आणि त्यांनी हा अनोखा प्रचार पाहण्यासाठी एकच गर्दी केली.

    थंगा काथीवरन यांनी मतदारांना एक आश्वासन देण्यासाठी ही कपडे धुण्याची कल्पना शोधून काढली. आपण ही निवडणूक जिंकलो तर मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला एक वॉशिंग मशीन देण्याचं आश्वासन थंगा यांनी दिलंय. निवडणुकीत वेगवेगळे उमेदवार अनेक प्रकारची आश्वासनं देत असतात. मात्र आश्वासन देण्यापूर्वी ज्या प्रकारे या आश्वासनाचं मार्केटिंग या उमेदवारानं केलं, ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

    निवडणुकीत पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित होतो आणि त्यात अनेक आश्वासनं देण्यात येतात. मात्र त्याव्यतिरिक्त उमेदवारदेखील आपापल्या मतदारसंघातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आकर्षक आश्वासनं देत असल्याचं चित्र अनेकदा पाहायला मिळतं.