on the threshold of mim footpath in solapur

बिहार निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी बजावणारे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे. इतर पक्षांशी युती करण्याची औपचारिक घोषणा होण्याची वाट न पाहता पक्षाने पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.

लखनौ : बिहार निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी बजावणारे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे. इतर पक्षांशी युती करण्याची औपचारिक घोषणा होण्याची वाट न पाहता पक्षाने पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.

अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाने अब्दुल मन्नान यांना बलरामपूर जिल्ह्यातील उत्रुला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मन्नान व्यवसायाने डॉक्टर आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पीस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर ते एआयएमआयएममध्ये दाखल झाले होते.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत युतीसाठी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी लखनऊमध्ये सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांची भेट घेतली. त्यानंतर एका दिवसानंतर महायुतीत सामील झाल्याबद्दल पुरोगामी समाजवादी पार्टी लोहिया (पीएसपीए) प्रमुख शिवपालसिंग यादव यांनीही राजभर यांची भेट घेतली होती.

एआयएमआयएम प्रमुख आणि लोकसभेचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एक ट्विट करुन हिंदूवादी संघटनांना लक्ष्य केले आहे. ओवेसी यांनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये एक व्हीडिओही आहे, ज्यामध्ये हिंदू संघटनांचा जमाव एका मशिदीच्या बाहेर दिसत आहे, तर काही लोक मशिदीच्या टॉवरवरील ध्वज काढताना दिसत आहेत. असा दावा केला जात आहे की या लोकांनी मशिदीची तोडफोड देखील केली. हा व्हीडिओ शेअर करताना ओवेसी यांनी या देशातील कट्टरतावादी धर्मांधपणाचा हा पुरावाच आहे. जेव्हा ते मशिदी पाडतात तेव्हा त्यांना अभिमान वाटतो अशी टीका त्यांनी केली. कट्टरतेची ही हद्दच आहे असेही ते म्हणाले.

ओवेसी यांनी ज्या घटनेसाठी हे लिहिले आहे ती मध्य प्रदेशातील मंदसौरची असल्याचे सांगितले जात आहे. ओवेसी यांनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये असा दावा केला गेला आहे की खासदार मंदसौर जिल्ह्यातील डोराणा गावात हिंदू संघटनांच्या लोकांनी मशिदीतून झेंडे काढले, मशिदीची तोडफोड केली. या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.