कोईम्बतूरमध्ये हवाई दलाच्या अधिकाऱ्याने केला भयानक प्रकार, महिला सहकारी झोपलेली असताना बलात्कार – पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोईम्बतूर एअरफोर्स कॉलेजमध्ये(Coimbatore Rape Case) भयानक प्रकार घडला आहे. ट्रेनिंगसाठी आलेल्या  अधिकाऱ्याला (Air Force Officer Arrested In Rape Case)बलात्काराच्या आरोपाखाली बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

    हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्यावर बलात्कार(Arrest) केल्याने अटक करण्यात आली आहे. कोईम्बतूर एअरफोर्स कॉलेजमध्ये(Coimbatore Rape Case) हा प्रकार घडला आहे. ट्रेनिंगसाठी आलेल्या  अधिकाऱ्याला (Air Force Officer Arrested In Rape Case)बलात्काराच्या आरोपाखाली बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात देशभरातून एकूण ३० हवाई दल अधिकारी कोईम्बतूर एअरफोर्स कॉलेजमध्ये(Coimbatore Air force College) ट्रेनिंगसाठी आले होते. पीडित २९ वर्षीय महिला अधिकारी १० सप्टेंबरला बास्केटबॉल खेळताना जखमी झाली होती. पाय दुखत असल्याने ती पेनकिलर घेऊन झोपली होती.

    महिला अधिकाऱ्याने सांगितले की, मध्यरात्री तिला जाग आली तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते आणि आरोपी अधिकारी तिच्या शेजारी निर्वस्त्र झोपला होता. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. यानंतर तिने कोईम्बतूर शहराच्या पोलीस आयुक्तांकडे आणि गांधीपूरम महिला पोलिसांकडे तक्रार केली. तपासाअंती लेफ्टनंट असणाऱ्या आरोपी अधिकाऱ्याला अटक झाली आहे,

    आरोपीला रविवारी सकाळी दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आलं. आरोपीच्या वकिलांनी कोईम्बतूर पोलीस अटक करु शकत नाही असं प्रतिज्ञापत्र सादर केलं. दरम्यान पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे.