कुणी ख्रिसमस तर कुणी रमजान साजरा करा, पण.., अमित शहांनी मांडली भूमिका

कुणी ख्रिसमस साजरा करावा तर कुणी रमजान साजरा करावा, आमचा कोणालाही विरोध नाही, पण सरस्वती पुजा आणि दुर्गा पुजा यांच्यावरही बंधनं यायला नाही पाहिजे. अशा शब्दांत अमित शहा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

    कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता थोडे दिवस राहिले आहेत. तृणमूल काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजपने संकल्पपत्र म्हणत जाहीरनामा जाहीर केला आहे. कुणी ख्रिसमस साजरा करावा तर कुणी रमजान साजरा करावा, आमचा कोणालाही विरोध नाही, पण सरस्वती पुजा आणि दुर्गा पुजा यांच्यावरही बंधनं यायला नाही पाहिजे. अशा शब्दांत अमित शहा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मेदिनीपुर येथे प्रचारार्थ आले असताना त्यांनी पश्चिम बंगालच्या जनतेच्या अपेक्षेनुसार व इच्छेनुसार संकल्पपत्र बनवल्याचं सांगितलं आहे. तसेच सोनार बांगलाची संकल्पना घेऊनच आम्ही निवडणूकीत उतरलो असल्याच त्यांनी स्पष्ट केलं. एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत भाजपकडून धार्मिक ध्रुवीकरण होत असल्याच्या आरोपासंदर्भात अमित शहा यांनी जनतेच्या मनातील प्रश्न उठवणे म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण आहे, ही नवीनच व्याख्या मी ऐकत असल्याचं बोलून दाखवलं.

    कुणी ख्रिसमस साजरा करावा तर कुणी रमजान साजरा करावा, आमचा कोणालाही विरोध नाही, पण सरस्वती पुजा आणि दुर्गा पुजा यांच्यावरही बंधनं यायला नाही पाहिजे. अशा शब्दांत अमित शहा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बंगालमध्ये दुर्गापूजा व्हायला हवी ही आमची भूमिका आहे. त्यावर तुम्ही बंधन घालता, तुम्ही ती पूजा थांबवता, मग हे धार्मिक ध्रुवीकरण नाही का? असा प्रश्‍नही त्यांनी या माध्यमातून ममता बॅनर्जी यांना विचारला आहे.