worlds largest tiranga

भारतीय सेना दिनाचे औचित्य साधत शनिवारी जैसलमेरमध्ये (Jaisalmer) भारत - पाकिस्तान सीमेवर (Indian Flag On India - Pakistan Border) खादीपासून तयार करण्यात आलेला राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ फडकावला जाणार आहे. (Worlds Largest National Flag Made Of Khadi) हा झेंडा खादीपासून बनवलेला जगातील सगळ्यात मोठा झेंडा आहे.

    जैसलमेर : दरवर्षी १५ जानेवारीला भारतीय सेना दिन (Indian Army Day) साजरा केला जातो.  (Army Day 2022) भारतीय सेना दिनाचे औचित्य साधत शनिवारी जैसलमेरमध्ये (Jaisalmer) भारत – पाकिस्तान सीमेवर (Indian Flag On India – Pakistan Border) खादीपासून तयार करण्यात आलेला राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ फडकावला जाणार आहे. हा तिरंगा २२५ फूट लांब आणि १५० फूट रुंद आहे. याचे वजन १४०० किलोग्रॅम आहे. हा झेंडा खादीपासून बनवलेला जगातील सगळ्यात मोठा झेंडा आहे. (Worlds Largest National Flag Made Of Khadi)

    हा तिरंगा लोंगेवालामध्ये प्रदर्शित करण्यात येईल. लोंगेवालाला खास महत्त्व आहे कारण हे ठिकाण १९७१ च्या भारत – पाकिस्तानच्या युद्धामध्ये मुख्य केंद्रस्थान होते. मिळालेल्या माहितीनुसार, १४०० किलोग्रॅमच्या या झेंड्याला तयार करण्यासाठी खादीच्या ७० कारागिरांना ४९ दिवस लागले. झेंडा बनवण्यासाठी ४५०० मीटर धागा हाताने कातून आणि विणून खादीचा सुती ध्वजपट तयार करण्यात आला आहे.हा ध्वज ३३,७५० फूटाचे क्षेत्रफळ व्यापणारा आहे. या झेंड्यातील अशोकचक्राचा व्यास ३० फूट आहे.

    सार्वजनिक प्रदर्शनासाठी बनवण्यात आलेला हा खादीचा पाचवा झेंडा आहे. याआधी २ ऑक्टोबर २०२१ ला लेहमध्ये पहिल्या तिरंग्याचे अनावरण करण्यात आले होते. दुसरा तिरंगा ८ ऑक्टोबर २०२१ ला वायू सेना दिनाच्या निमित्ताने हिंडन एअरबेसवर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर तिसरा तिरंगा २१ ऑक्टोबर २०२१ ला लाल किल्ल्यावर आणि चौथा तिरंगा ४ डिसेंबर २०२१ ला मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ नौसेना डॉकयार्डवर फडकावण्यात आला होता.