६५ कोटी खर्चून बांधले जाणार आशियातील सर्वात मोठे शिवमंदिर, दीड लाख शिवलिंगाचे घेता येणार दर्शन

छत्तीसगडमधील बेमेटारा येथे (Bemetara Shiva Temple)आशियातील सर्वात मोठे शिव मंदिर (Asia Biggest Shiva Temple) बांधले जात आहे. सालधा येथे उभारण्यात येणाऱ्या शिवमंदिरासाठी ६५ कोटींचा खर्च येणार आहे. मंदिरात भाविकांना १.२५ लाख शिवलिंगाचे दर्शन घेता येणार आहे.

    छत्तीसगडमधील बेमेटारा येथे (Bemetara Shiva Temple)आशियातील सर्वात मोठे शिव मंदिर (Asia Biggest Shiva Temple) बांधले जात आहे. सालधा येथे उभारण्यात येणाऱ्या शिवमंदिरासाठी ६५ कोटींचा खर्च येणार आहे. मंदिरात भाविकांना १.२५ लाख शिवलिंगाचे दर्शन घेता येणार आहे. शिवनाथ नदीकाठची चार एकर जमीन या मंदिरासाठी दान करण्यात आली आहे.

    मंदिरात दीड लाख शिवलिंगाची स्थापना होणार

    दंडी स्वामींच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य मंदिर उभारले जात आहे. मंदिरात दीड लाख शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार आहे. हे मंदिर ३४ हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधले जात आहे. विशाल जलकुंभाबरोबरच मंदिर परिसरात उद्यानही तयार करण्यात येणार असून सौरऊर्जेपासून विजेची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंदिर परिसरात एकाच वेळी पाच हजार लोकांना उभे राहता येणार आहे. मंदिरात आठ खोल्या बांधण्यात येणार असून त्यात पाठशाळेची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंदिराचे मुख्य शिखर ७५ फूट असेल.

    बेमेटारा येथे आशियातील सर्वात मोठे शिवमंदिर

    मंदिराची प्रदक्षिणा करण्यासाठी भाविकांना पाऊण किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. सलधा येथे १.२५ लाख शिवलिंगाची स्थापना आणि भव्य मंदिर उभारण्यासाठी जगद्गुरू शंकराचार्य स्वरूपानंद महाराज आणि दंडी स्वामी आदि मुक्तेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पायाभरणी करण्यात आली होती. सुमारे ६५ कोटी खर्चून बांधण्यात येणाऱ्या मंदिराच्या जागेवर दंडी स्वामींनी वैदिक मंत्रोच्चारांसह भूमिपूजन केले. सालधा हे गाव बेमेटरापासून १७ किमी अंतरावर आणि देवरबिजापासून १० किमी अंतरावर शिवनाथ नदीच्या काठी वसलेले आहे. बांधण्यात येणारे मंदिर हे आशियातील सर्वात मोठे शिवमंदिर असल्याचे मानले जाते.