atm theft

चेन्नईमध्ये एक एटीएममध्ये चोरीची घटना(Atm Theft In Chennai) उघडकीस आली आहे. मात्र या चोरीचा प्रकार पाहून पोलिसांसह बँक व्यवस्थापनालाही आश्चर्य वाटत आहे.

    लॉकडाऊनमध्ये(Lockdown) चोरीच्या(Theft) घटना खूप वाढल्या. चेन्नईमध्येही एक एटीएममध्ये चोरीची घटना(Atm Theft In Chennai) उघडकीस आली आहे. मात्र या चोरीचा प्रकार पाहून पोलिसांसह बँक व्यवस्थापनालाही आश्चर्य वाटत आहे. चोरांनी चेन्नईतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या एटीएममधील डिपॉझिट मशीनमधून अत्यंत हुशारीने ३५ लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम चोरून नेली.

    पैसे बाहेर येताच चोराने मशीनमध्ये आपले बोट अडकवले, त्यामुळे कॅश काढण्याचे सेक्शन काम करत नव्हते आणि जाग्यावर थांबले. त्यानंतर चोरांनी एटीएम कार्ड टाकून १० हजार रूपये काढण्याचा प्रयत्न केला. पैसे बाहेर येताच, त्यानंतर त्यांनी अनेकदा पैसे काढले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये चोरीची नवीन पद्धत घडली. पोलिसांना या दरोडेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्या आधारे त्यांचा शोध घेतला जात आहे.

    सेनॉय नगर येथील एसबीआय बँकेच्या शाखेचे व्यवस्थापक विरुगमबक्कम पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चोर एटीएममध्ये जाऊन पैसे काढत होते. व्यवहार झाल्यानंतर एटीएममधून पैसे निघत असताना चोर पैसे निघणाऱ्या जाग्यावर बोट ठेवत होते. इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्याने व्यवहार रद्द होतं असत. त्यानंतर चोर पैसे काढत होते. अशी प्रक्रिया चोर पुन्हा पुन्हा करत होते.

    चोरीची नवीन पद्धत उघडकीस आल्यानंतर एसबीआय बँकेच्या अनेक शाखांच्या व्यवस्थापकांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. रामपुरम-वल्लुवर रोड, वेलचेरी- विजयनगर, तारामणी, पेरियामेदू येथे एटीएम चोरीची घटना समोर आली आहे. अनेक एटीएममधून बदमाश्यांनी ३५ लाख रुपये चोरले.

    लोकं अनेकदा डिपॉझिट मशीनमध्ये पैसे जमा करतात. मात्र, यातून रोख रक्कमही काढता येते हे फार कमी लोकांना माहित असते. या माहितीचा फायदा घेत चोरांनी चोरी केली आहे. यांनी एसबीआयच्या डिपॉझिट मशीनवर जाऊन आणि डिपॉझिट मशीनमधून त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करुन पैसे चोरी केले.