attack on dilip ghosh

भवानीपूर पोटनिवडणुकीत(Bhabanipur Bypoll) प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे.प्रचारादरम्यान तृणमूल समर्थकांनी दिलीप घोष(Attack On Dilip Ghosh) यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

    पश्चिम बंगालमधील(West Bengal) भवानीपूर पोटनिवडणुकीत(Bhabanipur By poll) प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तृणमूल(Trinamool Congress) आणि भाजपाने(BJP) ही जागा जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येथून निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे भाजपाने प्रियांका तिब्रेवाल यांना उमेदवारी दिली आहे. प्रचारादरम्यान तृणमूल समर्थकांनी दिलीप घोष(Attack On Dilip Ghosh) यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. दिलीप घोष यांची भवानीपूरमध्ये पदयात्रा सुरू असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या दरम्यान भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

    भवानीपूर विधानसभा जागेसाठी ३० सप्टेंबरला मतदान होईल. आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. ममता बॅनर्जी आणि प्रियांका तिब्रेवाल यांच्यामध्ये या निवडणुकीत लढत पाहायला मिळणार आहे. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी राहण्यासाठी या निवडणुकीत विजय आवश्यक आहे. कारण मे महिन्यात झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालांमध्ये त्यांना नंदीग्राम मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले होते.