वेगानं येणाऱ्या ऑडी कारने थेट उडवली रिक्षा, थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद ; Video तुफान Viral

ही घटना २७ जून रोजी पहाटे हैदराबादमधील सायबराबाद परिसरात असलेल्या इनॉर्बिट मॉल जवळच्या रस्त्यावर घडली. पाऊस सुरू असताना रस्त्यावरून भरधाव निघालेल्या ऑडी कारने समोर असलेल्या रिक्षाला उडवलं. त्यानंतर कार पुढे निघून गेली. या भीषण अपघातात रिक्षातून प्रवास करत असलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

    रस्त्यावरून वेगानं येणाऱ्या ऑडी कारने एका प्रवाशी रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना हैदराबाद शहरातील सायबराबाद भागातील रस्त्यावर घडली आहे. अंगावर काटा यावा अशा अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. कारची धडक इतकी भीषण होती की, प्रवाशी रिक्षा गोलगोल फिरून बाजूला जाऊन आदळली. तसेच हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

    ही घटना २७ जून रोजी पहाटे हैदराबादमधील सायबराबाद परिसरात असलेल्या इनॉर्बिट मॉल जवळच्या रस्त्यावर घडली. पाऊस सुरू असताना रस्त्यावरून भरधाव निघालेल्या ऑडी कारने समोर असलेल्या रिक्षाला उडवलं. त्यानंतर कार पुढे निघून गेली. या भीषण अपघातात रिक्षातून प्रवास करत असलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला, तर रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारच्या चालकाने मद्यप्राशन केलं होतं. पार्टीतून तो ज्युबिली हिल्सकडे निघाला होता. परंतु जात असतानाच त्याने रिक्षाला जोरदार धडक दिली. याप्रकरणी पोलिसांनी ऑडी कारचालक सुजित आणि त्याचा मित्र आशिष यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

    दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना रुग्णालयात दाखल केलं. परंतु प्रवाशाचा मृत्यू झालेला होता, तर रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर आहे. त्याचप्रमाणे पुढील चौकशी पोलीस करत आहेत.