Bahujan Samaj Party state president Bhim Rajbhar's strange claim that those who drink toddy do not get corona

लखनऊ : जगभरात कोरोना रोखण्यासाठी उपयायोजना केल्या असताना ताडी प्यायल्यानं कोरोना होणार नाही असा अजब दावा उत्तर प्रदेशमधील एका नेत्याने केला आहे. जे लोक ताडी पितात त्यांना कोरोना होत नाही असेही या नेत्याचे म्हणणे आहे.

बलिया इथं बहुजन समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष भीम राजभर यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी हा अजब असा उपाय सांगितला आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा अजब दावा केलाय.

समाज असं मानतो की गंगेच्या पाण्यापेक्षा ताडी पवित्र आहे. ताडीमध्ये इम्युनिटी पॉवर आहे आणि ती प्यायल्यानं कोरोना होणार नाही. राजभर समाजातील लोक मुलांचे पालन पोषण ताडी पाजूनच करतात असंही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.