मास्क घातला नाही म्हणून बँक ऑफ बडोदातील सुरक्षारक्षकांने ग्राहकाला गोळी घातली ; ग्राहकाचा जागेवरच मृत्यू

ग्राहकाने मास्क न लावल्यामुळे बँकेच्या गार्डने गोळी घातली. यानंतर बराच वेळ ग्राहक (रेल्वे कर्मचारी) बँकेतील फरशीवर पडून होता. त्याची पत्नी शेजारी बसून रडत होती.

    बरेली: कोरोनाच्या काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई केली. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा यासाठी दंडात्मक करावाईही केली. मात्र उत्तरप्रदेश मधील बरेली येथे एका व्यक्तीला मास्क ना लावल्याने दंड म्हणून थेट आपला जीवाचा गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
    उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये बँक ऑफ बडोदाकडून (Bank of Baroda) मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. येथे एका ग्राहकाने मास्क न लावल्यामुळे बँकेच्या गार्डने गोळी घातली. यानंतर बराच वेळ ग्राहक (रेल्वे कर्मचारी) बँकेतील फरशीवर पडून होता. त्याची पत्नी शेजारी बसून रडत होती. मात्र तरीही बँक कर्मचाऱ्यांनी तातडीने पाऊले उचलली नाहीत. बऱ्याच वेळानंतर रेल्वे कर्मचाऱ्याला पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणात आरोपी गार्डला पोलिसांनी अटक केली आहे.

    व्हिडीओमध्ये बँकेच्या गेटवर रेल्वे कर्मचारी जखमी अवस्थेत जमिनीवर पडून आहे. त्यांना गार्डने गोळी घातली आहे. हैराण करणारी बाब म्हणजे गोळी घातल्यानंतरही गार्डला आपण केलेल्या चुकीची जाणीव नाही. तर तो रेल्वे कर्मचाऱ्याला तुरुंगात पाठविणार असल्याचं म्हणत आहे. रेल्वे कॉलनीत राहणारे राजेश राठोड पासबुकमध्ये एन्ट्री करवून घेण्यासाठी स्टेशन रोडजवळील बँक ऑफ बडोदामध्ये गेले होते. राजेशची पत्नी प्रियंका राठोडने सांगितलं की, राजेश यांनी मास्क लावला नव्हता, त्यामुळे गार्ड त्यांना बँकेत येऊ देत नव्हता. त्यानंतर राजेश घरी जाऊन मास्क घेऊन आले. मात्र तरीही गार्डने त्यांना बँकेत घेण्यास नकार दिला. लंच ब्रेक झाल्याचं सांगून गार्डने राजेशला नंतर येण्यात सांगितलं. यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात गार्डने त्याला गोळी घातली.