h d devegouda

एच.डी. देवेगौडा(H.D. Devegouda) यांनी १० वर्षांपूर्वी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नंदी इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडोर एंटरप्रायजेस (NICE)विरोधात अवमान करणारे विधान केले होते. याची नुकसान भरपाई म्हणून कंपनीला एच. डी. देवेगौडा यांनी २ कोटी(2 Crore Compensation) रुपये द्यावेत, असं कोर्टाने म्हटलं आहे.

    बेंगळुरूः माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा(Devegoda) यांना कर्नाटकातील बेंगळुरुच्या एका कोर्टाने एका प्रकरणात २ कोटींची नुकसान भरपाई(2 Crore Compensation) देण्याचे आदेश दिले आहेत. एच.डी. देवेगौडा यांनी १० वर्षांपूर्वी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नंदी इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडोर एंटरप्रायजेस (NICE)विरोधात अवमान करणारे विधान केले होते. याची नुकसान भरपाई म्हणून कंपनीला एच. डी. देवेगौडा यांनी २ कोटी रुपये द्यावेत, असं कोर्टाने म्हटलं आहे.

    एनआयसीने दाखल केलेल्या खटल्या प्रकरणी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मल्लनगौडा यांनी हे आदेश दिले. कंपनीचे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक हे अशोक खेनी आहेत. खेनी हे बीदर दक्षिण मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

    कन्नड वृत्तवाहिनीला २८ जून २०११ ला एच. डी. देवेगौडा यांनी मुलाखत दिली होती. या मुलखातीत अवमान करणाऱ्या वक्तव्यांमुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचली होती. यामुळे नुकसान भरपाई म्हणून देवेगौडा यांनी कंपनीला दोन कोटी रुपये द्यावेत, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

    ज्या योजनेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले ती योजना कर्नाटकचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवली. कंपनी योजना मोठी आहे आणि ती कर्नाटकच्या हिताची आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. पुढील काळात अशाच प्रकारची अवमान करणारी वक्तव्य आली तर कर्नाटकच्या जनतेचे हित असलेल्या या सारख्या अनेक योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई होईल. यामुळे अशा वक्तव्यांवर अंकुश आला पाहिजे, असं कोर्टाने स्पष्ट केलं.