
आयुष्यात एकदा तरी हेलिकॉप्टरने प्रवास करावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तथापि बसायची संधी जरी नाही मिळाली तरी कमीत कमी जवळून पाहून ‘दुधाची तहान ताका’वर भागविण्याचाही प्रयत्न केला जातोच. असाच प्रयत्न एका भंगारवाल्याने कल्पकतेने पूर्ण केला आहे. त्याने भारतीय वायुदलाचे 6 हेलिकॉप्टर खरेदी केले असून ते शहरातच उभे केले असून लोकांच्या आकर्षणाचे केंद्रही ठरले आहे. आबालवृद्ध या हेलिकॉप्टरमध्ये बसून सेल्फीही घेत आहेत आणि सोशल मीडियावर शेअरही करीत आहेत. खरेदी केलेल्या सहापैकी तीन हेलिकॉप्टर त्याने शहरात उभे केले आहे. एक हेलिकॉप्टर मुंबईतील तर दोन लुधियानातील एका हॉटेल व्यावसायिकाने खरेदी केले आहे.
मनसा : आयुष्यात एकदा तरी हेलिकॉप्टरने प्रवास करावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तथापि बसायची संधी जरी नाही मिळाली तरी कमीत कमी जवळून पाहून ‘दुधाची तहान ताका’वर भागविण्याचाही प्रयत्न केला जातोच. असाच प्रयत्न एका भंगारवाल्याने कल्पकतेने पूर्ण केला आहे. त्याने भारतीय वायुदलाचे 6 हेलिकॉप्टर खरेदी केले असून ते शहरातच उभे केले असून लोकांच्या आकर्षणाचे केंद्रही ठरले आहे. आबालवृद्ध या हेलिकॉप्टरमध्ये बसून सेल्फीही घेत आहेत आणि सोशल मीडियावर शेअरही करीत आहेत. खरेदी केलेल्या सहापैकी तीन हेलिकॉप्टर त्याने शहरात उभे केले आहे. एक हेलिकॉप्टर मुंबईतील तर दोन लुधियानातील एका हॉटेल व्यावसायिकाने खरेदी केले आहे.
भंगार व्यावसायिकाचा मुलगा डिंपल अरोडाने उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील सरसवा एअरबेसवरून 6 हेलिकॉप्टर खरेदी केले. या सहा हेलिकॉप्टरसाठी त्याला 72 लाख रुपये मोजावे लागले.
पंजाबमध्ये मिठ्ठू भंगारवाल्याचे नाव प्रसिद्ध आहे. भारतीय हवाई दलातील सहा जुनी हेलिकॉप्टर्स मिठ्ठूने खरेदी केली. यापैकी तीन हेलिकॉप्टर्स मानसामध्ये उभी आहेत. ही हेलिकॉप्टर्स पाहायला लोकांची गर्दी होत आहे. एका हेलिकॉप्टरचे वजन 10 टन आहे.
मानसा शहरातील चौकात असलेले हे हेलिकॉप्टर पाहण्यासाठी दुरवरून लोकं येत आहेत, हेलिकॉप्टरमध्ये बसत आहेत, त्याच्या शेजारी येऊन उभे राहत आहेत. जणू काही भंगारवाल्याने किमती खेळणी येथे आणली आहे त्याप्रमाणे अनेक जण आपल्या लहान मुलांनाही हेलिकॉप्टर दाखविण्यासाठी येथे आणत आहेत. हवाई दलाच्या सेवेत असलेल्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्याची खूप कमी जणांना मिळते. त्यामुळेच हवाई दलाने वापरलेल्या, सेवेतून निवृत्त झालेल्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्याची संधी अनेक जण साधत आहेत. त्याबद्दल भंगारवाल्याने आनंद व्यक्त केला.
भंगारवाल्यासाठी हेलिकॉप्टर खरेदीचा हा सौदा नफा मिळवून देणारा असल्याचे दिसत असले तरी शहरातील लोकांसाठी मात्र मनोरंजनाचे साधन ठरले आहे. या हेलिकॉप्टरमुळे सध्या मनसा शहर पर्यटन स्थळही झाले आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या निर्बंधामुळे गर्दी रोखण्यासाठी पोलिसांनाही येथे यावे लागत आहे. यामुळे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांचाही कामावरील ताण वाढला आहे.